18 April 2025 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांची कसून चौकशी करा - सुब्रमण्यम स्वामी

Sushant Singh Rajput, Subramanian Swamy, Copper Hospital

मुंबई, १० ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी आणखी एक खळबळजनक दावा केला. सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी नेला जात असताना त्याचा घोट्याखालील पाय फिरलेला (तुटल्यासारखा) होता. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांकडून ही माहिती पुढे आली होती. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांची कसून चौकशी केली पाहिजे. त्याशिवाय, या प्रकरणाचा गुंता सुटणार नाही, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.

सुब्रमण्यम स्वामींच्या या दाव्यामुळे आता याप्रकरणातील गुढ आणखी वाढले आहे. दरम्यान, ताज्या माहितीनुसार, ईडीच्या हाती एक बँक स्टेटमेंट लागली आहे. ज्यामध्ये संदीप सिंग आणि सुशांत यांच्यात पैशाचा व्यवहार झाला होता. संदीप सिंग सुशांतचा जवळचा मित्र होता. त्यांनी 14 जून रोजी सर्व औपचारिकता पूर्ण केली. अलीकडेच एका वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात सुशांतची मैत्रीण स्मिता पारीख म्हणाली की, संदीपला कुटूंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही. संदीपने सुशांतच्या वस्तू कूपर हॉस्पिटलमधून गोळा केल्या. संदीपच्या पीआरने त्याची आणि सुशांतच्या बहिणीची छायाचित्रे क्लिक केली होती. सुदीप सुशांतचा जवळचा असेल. पण खूप पूर्वी असेल., अशी माहिती लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे.

 

News English Summary: Sushant’s body was being transported in an ambulance for autopsy and his ankle was broken. The information came from the ambulance staff. Therefore, the Central Bureau of Investigation (CBI) should conduct a thorough inquiry into the five doctors at Cooper Hospital who performed the autopsy on Sushant’s body.

News English Title: Sushant Singh Rajput feet was twisted below his ankle says BJP leader Subramanian Swamy News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या