23 January 2025 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा SBI Mutual Fund | कमालच करतेय 'ही' SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 4 पटीने परतावा, सेव्ह करून ठेवा ही योजना Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स
x

बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या मनसे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना अटक

ठाणे : सोमवारी मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे दिवा नजिक येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळून लावत सरकारला थेट इशारा दिला होता. त्या आंदोलनात स्थानिक शेतकरी सुद्धा शामिल झाले होते. शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपार पासून या कारवाईला सुरुवात केली आहे.

शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी काही जणांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यातील २ शेतकऱ्यांसहित काही कार्यकर्त्यांना सोडून दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला दाखविलेल्या कडवट विरोधा नंतर ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शीळफाटा येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण सोमवारी अक्षरश: उधळून लावत जमीन मोजणीच्या मशीन सुद्धा फेकून दिल्या होत्या.

मनसेचे नेते राजू पाटील आणि ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या सह सर्व कार्यकर्ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांमध्ये रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले,कुशाल पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

सरकार शेतकऱ्यांचा विरोध धुडकावून दडपशाहीचा मार्ग आजमावत आहे. परंतु या दडपशाहीला मनसे कार्यकर्ते घाबरत नाही. स्थानिकांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मनसेचे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. तसेच बुधवारपासून हे आंदोलन गनिमी काव्याने केले जाईल असं ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x