23 December 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

कोविशिल्डचे दीड लाख डोस उपलब्ध झाले | मुंबईत उद्यापासून सर्व लसीकरण केंद्रे सुरु - महानगरपालिका

Vaccination

मुंबई, २५ एप्रिल: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे.

मुंबईत कोविशिल्ड लसींचे दीड लाख डोस उपलब्ध झाले असल्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं. उद्यापासून मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र कोवॅक्सिन ही लस ठराविक केंद्रांवर फक्त दुसऱा डोस घेणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्याचा साठा मर्यादित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मुंबईत ७ खासगी रुग्णालये, ३० सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रे अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरु असल्याची माहिती दिली. त्यांनी पुढे लोकांना आधी चौकशी करुन मगच लस घेण्यासाठी जाण्याचं आवाहनही केलं आहे. लसींचा साठा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असल्याने त्यांनी हे आवाहन केलं आहे.

 

News English Summary: Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal said that 1.5 lakh doses of Covishield vaccine have been made available in Mumbai. He also informed that all the vaccination centers in Mumbai will start from tomorrow. However, the vaccine will only be available at certain centers for those taking a second dose.

News English Title: The vaccination centers in Mumbai will start from tomorrow said Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x