23 February 2025 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे; आशिष शेलारांनी कमला मिलचं उदाहरण दिलं

BJP MLA Ashish Shelar, Mumbai Life Time

मुंबई: मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता येत्या २७ जानेवारीपासून मुंबईत नाइटलाइफ प्रत्यक्षात लागू होणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नाइट लाइफच्या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने विरोध दर्शविला आहे. नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबईकरांसाठी ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइटलाइफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?’ असा सवाल करत आशिष शेलार यांनी सरकारच्या नाइट लाइफ निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण येणार असल्याच राजकीय नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आता पोलिसांना गस्तीच काम असतं. पण, नाइट लाइफमुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही असं देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित असताना ‘नाइटलाइफ’चा घाट कोणाचे बालहट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे? असा बोचरा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. २७ जानेवारीपासून मुंबईमध्ये नाइटलाइफ सुरु करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. त्यावर ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाच्या टीकेचा आदित्य ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. ‘महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करतेय. लोकांच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. ‘नाइट लाइफ’चा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी करत आहोत. आमचं मन स्वच्छ आहे. शुद्ध हेतूनंच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ असा टोला आदित्य यांनी हाणला.

 

Web Title:  This is not night life but killing life BJP MLA Ashish Shelar criticizes State Government.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x