20 April 2025 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

घाटकोपर पश्चिम: राम कदमांच्या विरोधात भाजपमधील ४० इच्छुकांनी मुलाखती दिल्या

Assembly Election 2019, BJP, Ghatkopar West, MLA Ram Kadam, Controversial Statement about women, BJP Mumbai, Dahi handi

मुंबई : भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु असून तेथे तिकिटांसाठीही मोठी भाऊगर्दी उसळली आहे. दरम्यान, घाटकोपर पश्‍चिमचे विद्यमान आमदार राम कदम यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे ४० जणांनी पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारी मागितली आहे . आमदार राम कदम यांना मागील वर्षी दहीहंडीच्या वेळी केलेले वक्तव्य त्यांना आणि पक्षाला चांगलेच महागात पडले असून पक्षाने त्यांची प्रवक्ते पदावरून देखील हकालपट्टी केली आहे. मात्र आमदार राम कदम यांच्या विरोधात पक्षात अत्यंत नाराजीचं वातावरण असून, प्रचारादरम्यान महिलाविषयक मुद्यांना विरोधक बाहेर काढतील तेव्हा राम कदम यांचा मुद्दा पुढे येणार यात वाद नाही. त्यात स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री असल्याने त्यांचीच सर्वाधिक अडचण होणार आहे असं वृत्त आहे.

त्यामुळे पक्ष त्यांना अंधारात ठेवून आयत्यावेळी त्यांचं तिकीट कापू शकतं असं समजतं. विशेष म्हणजे याच मतदारसंघात असलेल्या इतर ताकदवान नेत्यांना त्याची चुणूक लागली असून अशा तब्बल ४० जणांनी आमदार राम कदम यांना न जुमानता भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला हजेरी लावून तिकीट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, राम कदमांचे महिलांविषयक अडचणीचे हेच मुद्दे संबंधित इच्छुक पक्षाच्या निदर्शनास आणून देत आहेत आणि जर त्यांना तिकीट ना मिळाल्यास तेच आमदार राम कदम यांचा मार्ग खडतर करतील अशी शक्यता आहे.

अद्याप विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ईशान्य मुंबईतील ६ विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल २०० जणांनी अर्ज केले आहेत. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून २० जणांनी तर घाटकोपर पश्‍चिमेतून तब्बल ४० जणांनी तिकिट मागितले आहे. नुकत्याच खासदार गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखालील समितीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी इच्छुकांची ही मोठी संख्या पाहून समिती पेचात पडली असणार हे निश्‍चित.

दुसरे म्हणजे या इच्छुकांमध्ये साध्या कार्यकर्त्यांपासून ते वजनदार कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचाच समावेश होता. प्रवीण छेडा, प्रकाश मेहता, अवधूत वाघ, राम कदम, राजू घुगे, प्रतीक्षा घुगे, संजय सिंह, दामू शर्मा अशी ही यादी असून त्यातील काहीजणांनी तर अनेक मतदारसंघातून अर्ज करून ठेवला आहे. त्यामुळे हसावे की रडावे अशीच निवड समितीची अवस्था झाली असणार हे निश्‍चित. मात्र या सर्वांमध्ये आमदार राम कदम यांचा मार्ग कठीण झाला आहे हे निश्चित म्हणावे लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#MLARamKadam(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या