15 January 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली

Shivsena Chief Uddhav Thackeray, Rashmi Thackeray

मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.

‘महाविकास’आघाडी झालेल्या निर्णयानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे त्यांना आमदारकीची शपथ देणार आहेत.

दरम्यान, काही वेळापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राजभवनला जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे उद्याचा मुख्यमंत्री शपथविधीचा सोहळा जोरदार करण्याचा शिवसेनेचा आणि महाविकासआघाडीच्या मानस असणार यात अजिबात शंका नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x