22 January 2025 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

मुंबईत एकाच दिवशी चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

Maharashtra Police, Mumbai Police, Corona Dead

मुंबई, १३ जून : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाखाचा आकडा पार केला आहे. काल दिवसभरात नव्या ३ हजार ४९३ रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या आता १ लाख १ हजार १४१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार ७१७ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय काल १ हजार ७१८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी देखील गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ४७ हजार ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ४९ हजार ६१६ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्याच्या पोलीस दलातही कोरोनाचा विळखा वाढत असून खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव यात गमवावा लागत आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मुंबईत आज एकाच दिवसो चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वाकोला, बोरिवली, दिंडोशी या पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. एकाच दिवशी चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने मुंबई पोलीस दलात एकाच खळबळ माजली आहे.

शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार मागील दोन दिवसांत १२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानुसार एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ३ हजार ३८८ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ४० पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यातील २७ जण हे मुंबईतील होते. तसंच एकूण १ हजार ९४५ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

 

News English Summary: Corona’s presence in the state’s police force is also on the rise, with many Khaki corona warriors losing their lives. Unfortunately, four policemen were killed by a corona in a single day in Mumbai today. He was working in Wakola, Borivali, Dindoshi police stations.

News English Title: Unfortunately four policemen were killed by a corona in a single day in Mumbai today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x