23 December 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

BJP Jan Ashirwad Yatra | स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठा बंदोबस्त | सेना-भाजप वाद पेटणार?

Bal Thackeray

मुंबई, १९ ऑगस्ट | मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं सकाळी मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन घालतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षरोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे. दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्व. बाळासाहेबांच्या नावाने भारतीय जनता पक्षाचे नेते अधिकार गाजवत त्यांच्या नावाचा आधार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या अगोदरच शिवसेनेने राणे यांना इशारा दिला आहे.

शिवसेनेचा आधीच इशारा (Union minister Narayan Rane will pay homage to Balasaheb Thackeray Smarak in Shivaji Park Mumbai)

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दादादरमधील शिवसेना प्रमुखांच्या (Bal Thackeray) स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही असे ट्विट त्यांनी बुधवारी केले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ परिसरात लावण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुंबई विमानतळ येथून याठिकाणी येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यात टिचर्स कॉलनी, शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते दादर येथील ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. त्यानंतर वीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथे दर्शन घेणार आहेत. महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, लालबागचा राजा येथे जाऊनही ते दर्शन घेणार आहेत. उद्यापासून नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल आणि 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग येथे त्याची समाप्ती होईल. मुंबई शहर उपनगर, वसई विरार, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग असा या यात्रेचा प्रवास असणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union minister Narayan Rane will pay homage at Balasaheb Thackeray Smarak in Shivaji Park Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x