23 February 2025 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरु आहेत - आठवले

Union Minister Ramdas Athavle, Build Buddha Vihar, Ayodhya

मुंबई, ३० जुलै : अयोध्येत सध्या राम मंदिर भुमिपुजनाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला देशभरातू कोणाला निमंत्रण दिलंय ? कोण जाणारेय ? यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. अशात आता अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.

अयोध्येतील वादग्रस्त जागा सोडून अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आठवले म्हणाले. त्यासाठी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची भेट घेणार आहेत. सरकारकडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आठवलेंनी सांगितले. ट्रस्ट उभारून जागा मिळवून तेथे बुद्ध विहार उभारण्याचा रिपब्लीकचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान आनंद शिंदे प्रसिद्ध गायक असून माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. आनंद शिंदेनी अयोध्येत बौद्धविहार उभारण्याची मागणी केली आहे. मी गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने ही मागणी करत आहे. अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरु आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन ३० एकर जागा खरेदी करणार, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

रामदास आठवले यांनी आपण स्वत: मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. “राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर मी जमीन पाहण्यासाठी जाणार आहे. चांगली जागा घेऊन तिथे बौद्धविहार बांधण्याचा माझा प्रयत्न आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

 

News English Summary: I have been working for a Buddhist temple in Ayodhya for a long time. If you get a seat from the government, that’s fine. But if he does not get land from the government, he will set up a trust there and buy 30 acres of land, said Ramdas Athavale.

News English Title: Union Minister Ramdas Athavle demanded to build Buddha Vihar In Ayodhya News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x