22 January 2025 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नाही | आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रतिउत्तर

Union Minister Ramdas Athawale, Prakash Ambedkar, MP Udayanraje Bhonsale

मुंबई, ९ ऑक्टोबर : महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कुलाबा येथील ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केल्याने मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर २० तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला मनसे स्टाईल दणका दिला.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी मी सहमत नाही, असे रामदास आठवलेंनी म्हंटले आहे. मराठा आरक्षणाविषयी बोलताना एक राजा तर बिनडोक असल्याची टीका वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी नामोल्लेख न करता खा. उदयनराजे यांच्यावर केली होती. यावर बोलताना रामदास आठवले यांनी छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे.

मराठा आरक्षणाला अडचण असल्याने एमपीएससी परीक्षा रद्द करू नये. एमपीएससी परीक्षा झालीच पाहिजे, अशीही भूमिका आठवलेंनी मांडली आहे. तसेच, बिहार निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना ५० उमेदवार उतरवणार आहे. परंतु, बिहारमध्ये शिवसेनेची ताकद नसल्यामुळे भाजपाला त्याचा फटका बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: Speaking about Maratha reservation, the president of the deprived Bahujan Aghadi, Adv. Eat without naming by Prakash Ambedkar. It was done on Udayan Raje. Speaking on this, Ramdas Athawale said that it is not right to call Chhatrapati Bindok.

News English Title: Union Minister Ramdas Athawale criticized Prakash Ambedkar over MP Udayanraje Bhonsale Marathi News LIVE latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x