विधानपरिषद | उर्मिलाने काँग्रेसची ऑफर नाकारली पण शिवसेनेची ऑफर स्वीकारली
मुंबई, ३१ ऑक्टोबर: राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या जागांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचेही ठरले आहे. यामध्ये एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचे. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी उमेदवारीस होकार दिल्याचे बोलले जात आहे. यावर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने विधानपरिषदेवर जाण्याची ऑफर दिलेली. मात्र, त्यांनी विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले होते. आता त्यांनी शिवसेनेवकडून जावे किंवा राष्ट्रवादीकडून याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मराठी चेहरा आणि मराठी नाव असल्यानं उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. याशिवाय त्या कला क्षेत्रातून असल्यानं राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य उमेदवार आहेत.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जवळपास वर्षभर उर्मिला मातोंडकर फारशा सक्रीय नव्हत्या. मागच्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या विधानांवरुन वाद निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा उर्मिला मातोंडकर चर्चेत आल्या. उर्मिला मातोंडकर यांनी कंगना रणौतने उपस्थित केलेल्या मुद्यांना, टीकेला उत्तर दिले. शिवसेनेसाठी तो एक दिलासाच होता. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष शांत होते.
दरम्यान, कंगना रणौतने मुंबईचा उल्लेख ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा केला होता. त्यावर उर्मिला यांनी कंगनाला हिमाचल प्रदेश या आपल्या गृहराज्यांकडे लक्ष द्यायला सांगितले. हिमाचल प्रदेश ड्रग्जचे मूळ आहे अस उर्मिला यांनी कंगनाला सुनावले होते. उर्मिला मातोंडकर आणि कंगन रणौत मधला हा वाद काही दिवस चांगलाच गाजला. कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले होते. या विधानाबद्दल कंगनावर बॉलिवूड आणि मीडियामधून बरीच टीका करण्यात आली होती. उर्मिला मातोंडकर यांनी कंगन रणौतचा चांगलाच समाचार घेतला होता.
उर्मिला मातोंडकर यांचे चातुर्य आणि आघाडीवर राहून लढण्याचा त्यांचा स्वभाव पक्षाला भावला. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असे शिवसेनेतील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. “उर्मिला मातोंडकर या अभिनेत्री असण्याबरोबरच त्या समाजाशीही जोडलेल्या आहेत. लोकसभेची निवडणूक त्या हरल्या. पण राजकीय परिपक्वता, ज्ञान आणि लोकांच्या समस्यांची जाणीव यामुळे त्यांनी अनेकांनी मने जिंकून घेतली. त्यांनी पुन्हा एकदा ते सिद्ध केले” असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले.
News English Summary: Congress offered Urmila Matondkar to go to the Legislative Council. However, he said he was not willing to go to the Legislative Council. Now he has the freedom to go from Shiv Sena or NCP, said minister Vijay Wadettiwar. Shiv Sena is trying to nominate Urmila Matondkar from its quota as she has a Marathi face and a Marathi name. Apart from that, since she is from the arts sector, there are suitable candidates for the governorship.
News English Title: Urmila Matondkar was offered by the Congress but she accepted Shivsena proposal said Wadettiwars News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON