27 December 2024 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद | शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसींचा तुटवडा

Vaccination

मुंबई , ०९ जुलै | लसीकरण मोहीम सुरू असून सतत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहेत. तसेच कमी लसीकरण केंद्रांवर लस द्यावी लागत आहे. गुरूवारीही लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. आज (शुक्रवार) लसीचा तुटवडा असल्याने पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लस उपलब्ध झाल्यावर पुन्हा लसीकरण सुरू:
मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना विरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत रोज ६० ते ७० हजार लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत चार वेळा एक ते दीड लाखापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत ५८ लाख ८४ हजार १९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. रोज होणाऱ्या लसीकरणाच्या आकडेवारीचा विचार केल्यास लसीचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. गुरुवारीही काही लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लसीचा साठा संपल्याने आज लसीकरण बंद ठेवले जाणार आहे. लसींचा साठा आल्यावर पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीकरण मोहीम:
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करांना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली गेली. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले. तरीही सध्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 ते 44 वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Vaccination is almost stop in Mumbai due to shortage of vaccine news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x