22 January 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

मोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी: प्रकाश आंबेडकर

Modi Government, VBA, Prakash Ambedkar

मुंबई: मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी झाली आहे, अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

या देशातील केंद्र सरकार हे कंगाल आणि दारुड्या सारखे सरकार आहे. तर RSS हे देशातील आतंकवादी आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद निकालावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या निकालाने समाधानी आहे. लोकांची कामं केली म्हणून आम्हाला अकोल्यात सत्ता दिली. तसेच काही जिल्हा परिषदांमध्ये आमचे सदस्य निवडून आले आहेत.

त्यांनी म्हटले की, सरकार चालवण्यासाठी सरासरी १३ लाख कोटी रुपये लागतात. मात्र, नवा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एवढी रक्कम सरकारी तिजोरीत जमेल की नाही, याबाबत शंका आहे. केंद्र सरकारला साधारण १२ लाख कोटीची तूट पडेल. दारुडा व्यक्ती घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे केंद्र सरकार मालमत्ता विकत सुटले आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा सरकारचा डाव आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)यासारखे मुद्दे पुढे केले जात असल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.

अमेरिका – इराण युद्ध सुरू झाले तर त्याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नोटबंदी दरम्यान एनआरआय लोकांना शासनाने पैसे डिपॉझिट करण्यात सूट दिली होती, याद्वारे किती पैसे आले याची माहिती सरकारने द्यावी. देशाची आर्थिक स्थिती लपविण्यासाठी CAA, NRC मुद्दे भाजप कडून पुढे केले जात आहेत, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. राष्ट्रवादी-काँग्रेस हे शेतात जे पिकतं त्याच्या नव्हे तर त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरील प्रेमी आहे, असे आंबेडकर म्हणाले.

 

Web Title:  VBA leader Prakash Ambedkar allegation on Modi government policies.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x