31 October 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाची ही योजना अनेक पटीने पैसा वाढवते, खास फंडात पैशाने पैसा वाढवा - Marathi News Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल Gold Investment | बापरे, सोन्याचा प्रति तोळा भाव लवकरच 86,000 रुपये होणार, ही आहेत 7 कारणं, सराफा बाजारात गर्दी Nippon India Growth Fund | कुबेराचा खजाना आहे ही म्युच्युअल फंड योजना, 1500 रुपये SIP वर मिळेल 4 कोटी रुपये परतावा IRB Infra Share Price | IRB इंफ्रा सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35% पर्यंत परतावा - NSE: GTLINFRA GTL Infra Share Price | GTL इंफ्रा सहित 5 पेनी शेअर्स फोकसमध्ये, 2 रुपयांची लेव्हल ओलांडताच तेजी वाढणार - NSE: GTLINFRA IREDA Share Price | IREDA शेअर फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने होणार कमाई, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने प्रचंड टीका होताच, भाजप नेते गुजरात कसा योग्य आणि महाराष्ट्र कसा चुकीचा सांगण्यास पुढे सरसावले

Vedanta Foxconn Project

Vedanta Foxconn Project | आज राज्यभरात युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन (Foxconn) प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. ‘शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान, यावरून भाजप नेते आता आक्रमक झाले असून त्यांच्या एकूण प्रतिक्रियेत गुजरातची बाजू सावरली जातेय असं स्पष्ट दिसतंय. आशिष शेलार यांनी याच विषयाला अनुसरून प्रतिउउतर दिलं आहे. ते म्हणाले, ‘हा प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिलीच कधी? पेंग्विनसेना प्रमुखांनी याचं उत्तर द्यावं… महाराष्ट्रात भ्रम पसरवण्याचं काम पेंग्विन सेनेच्या माध्यमातून होतंय, असा आरोप आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलाय. आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसाठी काही प्रश्न उपस्थित केले.

शेलार म्हणाले, ‘ हा प्रकल्प महाराष्ट्रात होता म्हणताय तर तो सुरु कधी झाला? मविआने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? जिथे तो प्रकल्प प्रस्तावित होता, तिथे जागेचं अॅक्विझिशन तरी झालं होतं का? खेचला म्हणताना या सर्व प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत…

वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला म्हणताय तर याची चौकशी करा, अशी विनंती आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते म्हणाले, ‘ आता खोटं सहन केलं जाणार नाही. केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणून हिणवणं, यासाठी रान उठवणार असाल तर… उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राला सत्य कळलंच पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे वेगळे.. हे चालणार नाही… असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vedanta Foxconn Project moved to Gujarat reaction from BJP leaders check details 15 September 2022.

हॅशटॅग्स

#Vedanta Foxconn Project(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x