22 January 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

विनोद तावडेंचे राज ठाकरेंना चॅलेंज, 'कट-पेस्ट' चं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी

MNS, maharashtra navnirman sena, raj thackeray, vinod tawade, bjp, bjp maharashtra

मुंबई: साऱ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील मराठी माणसांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या राज ठाकरेंना विनोद तावडेंनी खास टोला लगावला आहे. विनोद तावडेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत ‘कट-पेस्ट’ चं राजकारण सोडून काहीतरी ठोस भूमिका घ्या असं म्हटलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले राज ठाकरेंनी त्यांचा माणूस आमच्या सोबत पाठवावा मग आम्ही त्यांना गावाची दुसरी बाजू दाखवू.

राज ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी व अमित शहांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणात मोदींचे जुने व्हीडिओ राज ठाकरेंकडून दाखविण्यात येत आहेत आणि त्यातील एका व्हीडिओत मोदींचे जवानांबद्दलचे मत दाखविण्यात येत आहे. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, ”मोदी काय म्हणाले, व्यापारी हा रिस्क घेतो, तशीच सैन्याची रिस्क असते. सैन्याकडून एकही जवान शहीद न होता, सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक होणं शक्य आहे का? सैन्य प्लॅनिंग करुन आपलं मिशन पूर्ण करतं तसंच व्यापाऱ्यालाही अशीच रिस्क घ्यायची असते”, असा अर्थ मोदींच्या त्या भाषणाचा होतो. त्यामुळे केवळ कट-पेस्टचं राजकारण न करता राज ठाकरेंनी ठोस भूमिका घ्यावी, असे तावडेंनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांचे राजकीय वारस उद्धव ठाकरे असले तरी बाळासाहेबांची भाषण शैली आणि राज ठाकरे यात अगदी साम्य आहे. जनसागर जमवने आणि त्यांना आपल्या भाषणाने संमोहित करणे हि राज आणि बाळासाहेबांची खुबी. परंतु लोकसभा २०१९ च्या तोंडावर १ हि उमेदवार उभा नसताना केवळ देश वाचवण्याच्या भावनेतून त्यांनी राज्यभर सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

सध्याची त्यांची भाषण शैली बदलली नसून फक्त त्यात त्यांनी १ तडका लावण्यास सुरुवात केली आहे. आणि हा तडका म्हणजे “लाव रे तो व्हिडिओ” , हा शब्द ऐकताच सभेत एकच असा जल्लोष निर्माण होतो. त्यांनी सध्या आपल्या भाषणा दरम्यान व्हिडिओ पुरावे देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक सभेत ते मोदींची भाषणं दाखवून ते कशा प्रकारे देशाची दिशाभूल करत आहेत हे लोकांना दाखवत आहेत.

राज ठाकरेंनी मोदींची २०१४ पूर्वीची भाषणं आणि सध्याची काही विवादित भाषणं आपल्या सभेत दाखवण्यास सुरुवात केली आहे, मग त्यात जवानांच्या नावाने मत मागणे, एअर स्ट्राईक च्या नावाने लोकांना परावर्तित करणे असे काही विषय आहेत. तसेच मोदी आणि शहा हे देशाला कसे हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत याचे दाखले देत राज ठाकरे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला मतदान न करण्याचे आव्हान करत आहेत.

सध्या संपूर्ण भारतात अशा उत्तम प्रकारे भाषण करणारा दुसरा वक्ता कोणीच नाही हे दुर्दैव. विरोधकांना हि लाजवेल अशाप्रकारे सध्या ते मोदी सरकारला कोंडीत पकडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी भाजपच्या डिजिटल इंडियाची पोलखोल केली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले होते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x