22 January 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

Mumbai Power Cut | BMC Alert | लाइट आली, आता पाण्याचं टेन्शन

Water supply, power outage

मुंबई, १२ ऑक्टोबर : मुंबई व उपनगरांतील वीज पुरवठा आज दुपारी सुमारे साडेतीन तास ठप्प होता. युद्धपातळीवर बिघाड दुरूस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असला तरी पाणीपुरवठ्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने टेमघर येथील ठाणे महानगरपालिकेचे व स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपीग बंद झाले होते यामुळे ठाणे शहरास होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर पिसे व टेमघर येथील पंपीग सुरू करण्यात आले असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तरीही आज रात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे ठाणे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतही पाणी पुरवठ्याला फटका बसला आहे. पालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा आज सकाळी काही तास खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. ज्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यावर त्याचा अंशतः परिणाम होऊन, काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. याअनुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असला तरी उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने नमूद केले आहे. नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

News English Summary: Mumbai power cut: After a widespread power outage in and around Mumbai for over an hour, supply was gradually restored in a few areas, including Kharghar in Navi Mumbai, Churchgate in South Mumbai and Mumbra in Thane on Monday afternoon. Train services were also fully restored on both Central and Western Railway. Efforts are underway to resume supply in other affected locations. Taking cognizance of the matter, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray called for an immediate probe into the technical fault that led to the outage.

News English Title: Water supply in Mumbai and Thane was hit due to power outage Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x