5 November 2024 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

दहीहंडी करणारच? | कोरोनालाही आंदोलन करुन घालवा ना | दहीहंडी समन्वय समितीचा कदमांना टोला

MLA Ram Kadam

मुंबई, २३ ऑगस्ट | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातील गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांच्या प्रमुखांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.

भाजपाचे आमदार राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन काहीही झालं तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच असं आव्हान दिलं (We will celebrate Dahihandhi even in corona pandemic said BJP MLA Ram Kadam) :

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, गोविंदा पथकांचा प्रतिसाद:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (सोमवार) संवाद साधला. यावेळी मंडळानी मुख्यंमत्र्यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मात्र ही बैठक सुरु असतानाच भाजपाचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन काहीही झालं तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच असं आव्हान राज्य सरकारला दिलं आहे.

समन्वय समितीचा राम कदमांना टोला: (We will celebrate Dahihandhi said BJP MLA Ram Kadam)

राम कदम यांच्या या विरोधी भूमिकेसंदर्भात समन्वय समितीने बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना समितीच्या अधिकाऱ्यांनी, आम्ही निर्णय घेतल्यानंतर काही लोक आंदोलन करतात, विरोधी भूमिका घेतात असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याचं नमूद केलं. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “करोनालाही आंदोलन करुन घालवा ना”, असं या विरोध करणाऱ्यांना सांगितल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्याचं हे वक्तव्य राम कदम यांनाही लागू होतं, असं समन्वय समितीने म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: We will celebrate Dahihandhi even in corona pandemic said BJP MLA Ram Kadam news updates.

हॅशटॅग्स

#MLARamKadam(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x