22 November 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पश्चिम रेल्वे मार्गावर २ महिला विशेषसह ६ फेऱ्या वाढणार

Western railway, ladies Special Train, Central Railway, Lockdown

मुंबई, २८ सप्टेंबर : रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सोमवारपासून (२८ सप्टेंबर २०२०) पश्चिम रेल्वे मार्गावर ५०० ऐवजी ५०६ फेऱ्या (local trip) धावणार आहेत. वाढवण्यात आलेल्या सहा लोकल फेऱ्यांपैकी २ महिला विशेष (Ladies special) आहेत. वाढील लोकल फेऱ्यांमुळे गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

पश्चिम रेल्वे (western railway) मार्गावर ५०० आणि मध्य रेल्वे (central railway) मार्गावर ४२३ लोकल फेऱ्या रविवार रात्रीपर्यंत सुरू होत्या. या फेऱ्या सुरू राहतील आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवारपासून २ महिला विशेषसह एकूण ६ लोकल फेऱ्या वाढतील. मनसेने लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करा नाही तर मुंबई आणि आसपासच्या सर्व शहरांतील पालिकांची बस वाहतूक तसेच राज्य परिवहनच्या एसटी यांच्या फेऱ्या वाढवून नागरिकांची सोय करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पश्चिम रेल्वेवर लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

सध्या लोकलमधून फक्त केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आणि बँक कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी आहे. मर्यादीत नागरिक प्रवास करत असले तरी गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

लॉकडऊनआधी महिलांसाठी विशेष गाड्या होत्या. मात्र अनलॉकनंतर महिला विशेष गाड्या बंद करण्यात आल्या. मर्यादीत प्रवासी संख्येचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला. नव्या व्यवस्थेत १२ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणीचे ३ डबे राखीव असतात. या व्यतिरिक्त ३ प्रथम श्रेणी डब्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आसने राखीव असतात. एकूण महिला प्रवाशांची संख्या विचारात घेतल्यास ही व्यवस्था अपुरी पडत आहे. याच कारणामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवारपासून वाढवण्यात आलेल्या सहा लोकल फेऱ्यांपैकी २ महिला विशेष आहेत.

विशेष म्हणजे महिला डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होतं असल्याचं पाहायला मिळत असून कोरोना संसर्गाचा धोका देखील त्यामुळे वाढण्याची शक्यता करण्यात आली होती. मात्र ट्रेनची संख्या आणि फेऱ्या वाढल्यास महिलांना काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.

 

News English Summary: In order to maintain social distancing and to avoid overcrowding, Western Railway has taken the decision to increase the number of daily special suburban services by adding 6 more services including two Ladies Special trains from Monday. 500 special suburban services were being operated by Western Railway for Essential Services Staff as notified by the Government of Maharashtra. To this, 6 more trains are being added in order to bring flexibility in transportation.

News English Title: Western railway adds six services two only for women Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#railway(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x