CBI, ED | निवडक माहिती माध्यमांना देण्यामागे यांचा काही तरी अजेंडा आहे - विधिज्ञ उज्वल निकम

मुंबई , ३० सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि एनसीबी कडून केला जात आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर तपासाची दिशा बदलली. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याबाबत तपास सुरूच आहे. याप्रकरणात एम्सच्या फॉरेन्सिक टीमकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात एक निवेदन अध्यक्ष डॉ. सुधीर गुप्ता यांच्यामार्फत जारी केले आहे. मुंबईतील वांद्रे येथील सुशांत त्याच्या निवासस्थानी 14 जून रोजी मृतावस्थेत आढळून आला होता. एम्सच्या तज्ज्ञांची टीम व्हिसेरा चाचणीच्या निकालांवर आणि क्राईम सीन रिक्रेएशनच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)कडे त्यांचा अहवाल सादर करणार आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या घटनेबाबत आणखी चर्चा आवश्यक असल्याचे मत मेडिकल बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे.
मात्र कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या सीबीआय, ईडी सारख्या संस्थांनी निवडक माहिती माध्यमांना देण्यामागे काही तरी अजेंडा आहे. कोणाला तरी बदनाम करायचे आहे किंवा या गुन्ह्यातून जे निष्पन्न होईल. त्याच्याशी त्यांचे सोयरसुतक नसेल असाच याचा अर्थ निघतो, अशा शब्दांत ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी सुशांतसिंह प्रकरणात चालू असलेल्या तपासावर नाराजी व्यक्त केली. लोकमत यूट्यूबवरच्या ‘ग्राऊंड झिरो’ मुलाखतीत ते बोलत होते.
पोलिस, सीबीआय, ईडी यांना प्रसिद्धीचा रोग जडला आहे. तपासातील बारकावे प्रसार माध्यमांना दिले जातात. माध्यमं म्हणतात की, आमच्या सोर्सनी ही माहिती दिली. ईलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तुलनेत प्रिंट मीडियाला हा रोग नाही. ते भानावर आहेत. ईलेक्ट्रॉनिक मीडिया गुन्ह्याच्या साक्षीदारांना पॅनलवर बोलावतात, त्यांची मुलाखत घेतात. तपास यंत्रणेला त्या साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि विविध चॅनलला दिलेला जबाब यात तफावत असते. यातून फायदा आरोपीचा होतो. मग आरोपी उलट तपासणीत असे दाखवून देतो की, त्या साक्षिदारांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जबाब दिले आहेत. न्यायालयात ते पटवून देतात आणि अमूक साक्षिदाराची साक्ष अविश्वसनीय मानावी असा युक्तिवाद होतो.
या तपास यंत्रणांना दोन खडे बोल सुनवायला सरकार का मागे पुढे पाहते, याचे उत्तर मला सापडले नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर वेळीच लगाम घातला पाहिजे, असेही अॅड. निकम म्हणाले.
News English Summary: Law enforcement agencies like the CBI and the ED have an agenda to provide selective information to the media. Someone wants to defame or whatever will result from this crime. This means that he will not have a soy sauce with him, in such words, senior lawyer Ujwal Nikam expressed his displeasure over the ongoing investigation in Sushant Singh’s case. He was speaking in a ‘Ground Zero’ interview on Lokmat YouTube.
News English Title: What exactly is the CBI agenda in providing selective information to the media said Advocate Ujjwal Nikam Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON