23 February 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

माझी ताकद काय आहे | हे १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा - संजय राऊत

105 MLA, BJP Maharashtra, Sanjay Raut, Marathi News ABP Maza

मुंबई 6 सप्टेंबर: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे रविवारी दिवसभर विरोधकांच्या निशाण्यावर राहिले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर…कंगना रणौतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख हरामखोर मुलगी असा केला. यावरुन सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांना चांगलंच धारेवर धरलं. अनेक सेलिब्रेटींनी राऊतांनी माफी मागावी अशी मागणी केली. विरोधी पक्षातील भाजपाने सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सूचक शब्दांत संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.

“माझी ताकद काय आहे, हे त्या लोकांना विचारा, ज्यांच्याजवळ १०५ आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये बसले आहेत….जय महाराष्ट्र!” असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कंगना रानौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.

कंगना रणौतवर टीका करताना संजय राऊत यांनी तिच्याबद्दल अपशब्द वापरला. त्यामुळे आज सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी आणि विरोधी पक्षांनी संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच, याबद्दल निषेध व्यक्त करत अनेक सेलिब्रिटींनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली. तर विरोधी पक्षातील भाजपाने सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे म्हटले. मात्र, यावर संजय राऊत यांनी पुन्हा फेसबुकवरून पोस्ट करत माफीची मागणी करणाऱ्यांना आणि विरोधकांना सुनावले आहे.

 

News English Summary: What is my strength, ask those people who have 105 MLAs but are seating in the Opposition …. Saying Jai Maharashtra, Sanjay Raut has slammed the Opposition. Meanwhile, Kangana Ranaut and Shiv Sena leader Sanjay Raut have been at loggerheads for the past few days.

News English Title: What is my strength ask those seating in opposition despite having 105 MLA Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x