29 April 2025 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

सावरकरांबद्दल लिहिलेलं ते मासिक मागे घेणार नाही; काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेना पेचात

Congress spokesperson Sachin Sawant, Veer Savarkar, Devendra Fadnavis

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.

शिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकर यांच्याविषयी गलिच्छ लिखाण करण्यात आले आहे. काँग्रेसने महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच सुरु केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीतही शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. ही लाचारी शिवसेना किती काळ सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी. भाजपा असे अपमान सहन करणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचं लिखाण करणार असेल, तर भारत देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. शिवसेनेला हे लिखाण मान्य आहे का?, शिवसेनेला हे लिखाण मान्य नसेल तर उद्धवजी काय भूमिका घेणार आहेत. काँग्रेस पक्षानं शिदोरीतले हे लेख मागे घेतले पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रानं शिदोरी या मासिकावर बंदी घालावी, अशी मागणी मी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंकडे करणार आहे असं देखील फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मध्य प्रदेशात अतिक्रमाणाची कारवाई करत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भोपाळमध्ये उमटले. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे.

तसेच देवेंद्र फडणवीसांना इतिहास माहित नसावा, परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी सतत सावरकरांचा विषय पेटवण्याचा उद्योग फडणवीस करत असून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यात त्यांना यश येणार नाही असा टोला सचिन सावंत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

 

Web Title: What written about Savarkar is based on Historical fact says Congress spokesperson Sachin Sawant.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या