15 November 2024 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

कॅग रिपोर्टमध्ये शिवसेनेची पोलखोल; कसली नालेसफाई, गटारे प्रचंड गाळाने अजूनही भरलेली

Shivsena, Uddhav Thackeray

मुंबई : मुंबई शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाल्याच्या थेट दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला होता. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील नाले आणि गटारांमधील गाळ काढण्यासाठी मोठे टेंडर देखील काढण्यात आले होते. मात्र सत्ताधारी शिवसेनेची आज विधानसभेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कॅग रिपोर्ट’मध्ये पोलखोल झाली आहे. प्रतितास केवळ २५ मि.मी पडलेल्या पावसाचे पाणी वाहण्याची मुंबईतील गटारांची क्षमता असून मुंबईतील गटारे गाळाने आजही भरली असल्याचे कॅगने आपल्या अहवालात समोर आणले आहे. मुंबईत साचणाऱ्या पाण्यास मुंबई महापालिकेचा ढीसाळ कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं कॅगने आपल्या अहवालात उघड केल्याने सत्ताधारी शिवसेना तोंडघशी पडली आहे.

विधानसभेत आज मांडण्यात आलेल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई का तुंबते याची उत्तरे कॅगने आपल्या अहवालात समोर आणली आहेत. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या पूर आपत्ती व्यवस्थापनातात कॅगला त्रुटी आढळून आल्या आहेत.

कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेवर खालील ताशेरे ओढण्यात आले आहेत.

  1. मुंबईत बांधण्यात आलेले गटारे सपाट बांधण्यात आल्याने भरती, ओहोटीचा त्यावर परिणाम होतो
  2. गटारे प्रचंड गाळाने भरलेली आहेत
  3. पाण्याचा विसर्ग करणारी नलिका समुद्र पातळीच्या बरीच खाली आहे
  4. ४५ विसर्ग नलिकांपैकी केवळ तीन ठिकठिकाणी पुराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजे आहेत
  5. त्यामुुळे या तीनच ठिकाणच्या भरतीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते
  6. २५ मिमी प्रतितास पावसासाठीच मुंबईतील गटारांची क्षमता
  7. मोठ्या नाल्यांमध्ये केबल्स, पाईपलाईन अडथळा ठरतात
  8. नाल्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष
  9. छोटे नाले अयोग्य जागी असणे आणि प्रभावी नसणे
  10. नाल्यांची अयोग्य रचना
  11. भूस्खलनाच्या घटना घडूनही ठोस उपाय नाही

मुंबईत २०१५ ते २०१७ या कालावधीत तब्बल ३३ भूस्खलनाच्या घटना घडल्या, ज्यात १२ जण जखमी झाले होते. मात्र या घटना वारंवार घडूनही मुस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. याबाबत जिऑग्राफीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात भूस्खलनावर उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिला होता. मात्र या अहवालाकडे महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही कॅगने ठेवला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x