14 November 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC
x

पुनर्विवाहानंतरही विधवा पत्नीचा पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार | हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

High Court

मुंबई, ०७ सप्टेंबर | पतीच्या निधनानंतर विवाह केलेल्या पत्नीचा पुनर्विवाहानंतरही पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.हिंदू वारसा कायद्याच्या कलम १० अंतर्गत विधवा पत्नी आणि आई दोन्ही पतीच्या निधनानंतर प्रथम वारसदारांमध्ये येतात.त्यामुळे आईचाही अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

पुनर्विवाहानंतरही विधवा पत्नीचा पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल – Widow’s right to first husband’s property even after remarriage Mumbai High Court verdict :

अनिल हा रेल्वेत पॉईंटसमन म्हणून कार्यरत होता. १९ एप्रिल १९९१ ला त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर महिनाभरातच पत्नी सुनंदाने पुनर्विवाह केला. अनिलने नोकरीवर असताना सर्व लाभासाठी आपल्या पत्नीच्या नावाची नोंदणी केली होती.

त्यामुळे अनिलच्या पत्नीने रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी अर्ज केला. तसेच पतीच्या मृत्यूनंतर रेल्वेने ६५ हजार रुपये सुनंदाच्या बँक खात्यात जमा केले. त्यामुळे अनिलच्या आईने दिवाणी न्यायालयात रेल्वेच्या निर्णयाविरुद्ध अर्ज करून सुनंदाने पुनर्विवाह केला असून तिला अपात्र ठरवण्याची विनंती केली. दिवाणी न्यायालयानेही पत्नीला अपात्र ठरवून आईच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे पत्नीने अपील दाखल केले. अपिलावर जिल्हा न्यायालयाने लाभाची रक्कम आई व पत्नीच्या खात्यात बरोबर जमा करण्याचे आदेश दिले.

त्याविरुद्ध अनिलच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हिंदू वारसा कायद्याच्या कलम १० अंतर्गत विधवा पत्नी आणि आई दोन्ही पतीच्या निधनानंतर प्रथम वारसदारांमध्ये येतात. त्यांचा मृत मुलाच्या संपत्तीवर समान अधिकार आहे. पत्नीने रेल्वेकडून मिळालेल्या रकमेची निम्मी रक्कम रेल्वेला परत करावी आणि रेल्वेने ती रक्कम अनिलच्या आईला द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Widow’s right to first husband’s property even after remarriage Mumbai High Court verdict.

हॅशटॅग्स

#Social(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x