22 January 2025 10:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

त्यांना 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? - आ. आशिष शेलार

CM Uddhav Thackeray, MLA Ashish Shelar, Corona Graduate

मुंबई, १ जून: आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? आम्हाला अशा नव्या बिरुदावलीने तर ओळखले जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार ऍड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

हा निर्णय आपण विद्यार्थी हित व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता या भूमिकेतून घेतलेला आहे. विद्यार्थी हित हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आरोग्याचे हित जपताना शैक्षणिक आरोग्य ही महत्त्वाचे आहे. या निर्णयावर आम्ही भाष्य न करता तुम्ही घेतलेल्या भूमिकेशीच आमची भूमिका मिळतीजुळती आहे. हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना वाटते आहे की, आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? या सह काही प्रश्न या निर्णयाबाबत उपस्थितीत होतात.

विद्यार्थ्यांच्या मनात भय निर्माण करणाऱ्या अशा प्रश्नांची तातडीने उत्तरे देऊन या निर्णयात अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपताना त्याचे आरोग्य हित जपताना त्याचे शैक्षणिक आरोग्य ही जपले जाईल, असे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना चिंता मुक्त केले पाहिजे म्हणून खालील प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या त्यांनी निदर्शनास आणून दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील सध्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करत, सरासरी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड करत मुख्यमंत्र्यांचा हा लोकप्रियता मिळवण्यासाठीचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा नाराजीचा सूर त्यांनी आळवला.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेवून त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच सरकारने केला असल्याची भूमिका अभाविपकडून स्पष्ट करण्यात आली. शाळा सुरु करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला असला तरी दुसरीकडे त्याच महिन्यात होवू घातलेल्या परीक्षा रद्द करणं म्हणजे लोकप्रिय घोषणाच असं म्हणत यातून विद्यार्थ्यांच्या जीवाची नव्हे तर कोरोना परिस्थितीत आपलं अपयश लपविण्यासाठीच सरकारने घेतलेला हा निर्णय आहे असं मत अभाविपकडून मांडण्यात आलं.

 

News English Summary: We wouldn’t be called “Corona Graduate”, would we? We will not be recognized by such a new degree, will we? Will 40% of students with ATKT fail? BJP leader and former education minister MLA Ad Ashish Shelar has written a letter to the Chief Minister drawing attention to the issues that have created fear in the minds of students in the final year of graduation.

News English Title: Will 40 percent students ATKT be failed MLA Ashish Shelars letter CM Uddhav Thackeray News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x