डॉ .रेड्डीज लॅबोरेटरीज मुंबई महानगरपालिकेला स्पुटनिक लसीचा पुरवठा करणार
मुंबई, ०४ जून | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईकरांना स्पुटनीक लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. लसींच्या तुटवड्याअभावी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढत लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान आता डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत बोलणी यशस्वी झाली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड – 19 प्रतिबंधक लस देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्धीस दिलेल्या लस पुरवठा स्वारस्य अभिव्यक्तीमध्ये प्रतिसाद दिलेले सर्व 9 संभाव्य पुरवठादार कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरले आहेत.
असे असले तरी, महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता, स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज (दिनांक 4 जून 2021) संपर्क साधला असता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर दिनांक 12 मे 2021 रोजी स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. त्यास प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने पहिल्यांदा दिनांक 25 मे 2021 पर्यंत आणि दुसऱ्यांदा दिनांक 1 जून 2021 पर्यंत अशी दोनवेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रं पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली.
News English Summary: This is important news for Mumbaikars. Dozens of Sputnik vaccines will now be available to Mumbaikars. Due to shortage of vaccines, Mumbai Municipal Corporation had started efforts to make vaccines available through global tenders. Meanwhile, Mumbai Mayor Kishori Pednekar has informed that the talks with Dr. Reddy’s Laboratories have been successful.
News English Title: BMC will get Sputnik V vaccine from Dr Reddy said Mumbai Mayor Kishori Pednekar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS