23 December 2024 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानेच कोरोना संकटावर मात करू शकतोय - संजय राऊत

CM Uddhav Thackeray, MP Sanjay Raut

मुंबई, १९ जून : शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानेच कोरोना संकटावर मात करू शकतोय. पूर्ण सत्ता जेव्हा शिवसेनेची येईल, सेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हाच स्वप्न पूर्ण होईल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

दरम्यान, संजय राऊत यांनी देखील मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंकडे आम्ही तुमच्याकडे उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

 

News English Summary: With Uddhav Thackeray as the Chief Minister, Corona can overcome the crisis. The dream will come true only when Shiv Sena comes to power, 180 MLAs of Sena come, then you will be the Chief Minister, said Sanjay Raut.

News English Title: With Uddhav Thackeray as the Chief Minister Corona can overcome the crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x