15 January 2025 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

योगेश सोमण सुट्टीवर गेले, गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालक

Mumbai University, RSS, Yogesh Soman

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांना आम्ही सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला असून ते सुट्टीवर गेल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान त्यांच्या जागी प्रभारी संचालक म्हणून प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तत्पूर्वी अभाविपने राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निषेध केला. या निषेधाचाच भाग म्हणून अभाविपचे शिष्टमंडळ गुरुवारी कुलसचिवांची भेट घेण्यासाठी मुंबई विद्यापीठात पोहोचले आणि त्यांनी काही मागण्या केल्या. या मागण्यांमध्ये जर योगेश सोमण यांची नियुक्ती चुकीची असेल किंवा ते त्या पदासाठी अपात्र असतील, तर मागील ५ वर्षांत विद्यापीठात ज्या अधिकारी किंवा प्राध्यापकांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्या पात्रतेचीही चौकशी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. अभाविपच्या या निवेदनानंतर योगेश सोमण हे सक्तीच्या रजेवर नाहीत. ते पहिल्यापासूनच सुट्टीवर असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

तर दुसरीकडे रजेवर असलेल्या योगेश सोमण यांच्या जागी प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांना मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अँड आर्टस् विभागाचे प्रभारी संचालक म्हणून धुरा सांभाळणार आहेत. सोमण हे सुट्टीवर गेल्यानंतर आता प्रा गणेश चंदनशिवे यांची प्रभारी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. योगेश सोमण प्रकरणात मुंबई विद्यापीठाने नेमलेल्या समितीचा निर्णय येईपर्यंत गणेश चंदनशिवे कारभार पाहणार आहेत. गणेश चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले होते, योगेश सोमण ही व्यक्ती, त्यांनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांना शिकवण्याचा कोणताही अनुभव नाही, नाट्यशास्त्र विभागाची कोणतीही पदवी यांनी घेतलेली नाही. ते राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी होते, असे असतानाही काही योग्य आणि पात्र व्यक्तींना डावलून सोमण यांची मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती असा दावा देखील त्यांनी केला होता.

 

Web Title:  Yogesh Soman not forced leave so they have already applied leave says Mumbai University officials.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x