19 April 2025 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू

Yusuf Memon, 1993 Mumbai serial blasts, Died in Nashik Central Jail

नाशिक, २६ जून : १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या युसूफ मेमनचे नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकलेले नसून शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळ्यात पाठवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. युसूफ मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमन याचा भाऊ होता.

मुंबईच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेमन (54) याला शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह त्रास होऊ लागल्याने त्यात जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने मेमन याचे निधन झाले. औरंगाबाद कारागृहातून 2018 मध्ये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात आली होती. औरंगाबाद कारागृहाच्या पूर्वी मेमन १९९३ पासून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या युसुफ अब्दुल रज्जाक मेमनचा शुक्रवारी (दि.२६) दुपारी जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०१८ सालापासून मेमन नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. युसुफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे येथील शासकिय महाविद्यालयात केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन हा १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात आरोपी होता. त्याने या बॉम्ब स्फोटची योजना आखण्यासाठी आपला फ्लॅट आरोपींना दिला होता. 1992-93 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 800 जणांना मृत्यू झाला होता. तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. या भयावह बॉम्बस्फोटाचा सूत्रधार हा टायगर मेमन होता. मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. यामुळे या खटल्यात टायगर मेमन याचं अख्ख कुटुंब आरोपी होते. टायगर मेमन, युसूफ मेमन, रुबिना मेमन, याकूब मेमन, इसा मेमन हे आरोपी आहेत. तर, यापैकी टायगर मेमन अजूनही फरार आहे. तर याकूबला फाशी देण्यात आली आहे. इसा, रुबिना, युसूफ हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. यापैकी युसूफचा आज नाशिक जेलमध्ये हृदय विकाराने मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: Yusuf Memon, who was serving a life sentence in the 1993 Mumbai serial blasts case, has died in Nashik Central Jail. The cause of his death is still unknown and his body has been sent to Dhule for autopsy.

News English Title: Yusuf Memon who was serving a life sentence in the 1993 Mumbai serial blasts case has died in Nashik Central Jail News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या