15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
15x15x15 Formula | प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत घेतो. आपल्याजवळ लाखो आणि करोडोंच्या घरात पैसे जमा व्हावे. आपणही विमानाने फिरायला जावे. त्याचबरोबर मोठमोठ्या गाड्यांमधून प्रवास करावा असं स्वप्न प्रत्येक व्यक्तीचं असतं. बऱ्याच व्यक्तींना पैसे कमवून वेगवेगळे गोल्स अचिव करायचे असतात. काहींना स्वप्नातलं घर खरेदी करायचं असतं तर, अनेकांना परदेशात स्थायिक व्हायचं असतं. या सर्व गोष्टींसाठी लागतो तो म्हणजे पैसा. पैसे आहे तर जीवन आहे.
सध्याची महागाई लक्षात घेता तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी श्रीमंत व्हायचं असेल तर, गुंतवणुकीशिवाय कोणताच पर्याय तुमच्यासमोर उरलेला नाही. गुंतवणुकीसाठी नेमके कोणते माध्यम निवडायचे, त्याचबरोबर किती रुपयांची गुंतवणूक सुरू करायची असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतात. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
गुंतवणूक क्षेत्रात सध्या बरेच म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोटींच्या घरात नेऊन ठेवत आहेत. तुम्हाला देखील भविष्यात करोडपती व्हायचं असेल तर, SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करावा लागेल. आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त फॉर्म्युला देखील सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही लवकरात लवकर श्रीमंतीचं घर गाठू शकता.
SIP 15x15x15 फॉर्म्युला आहे तरी काय :
1. गुंतवणूकदारांसाठी एसआयपी माध्यम अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. जर तुम्ही, एसआयपीच्या 15X15X15 या फॉर्म्युलाचा वापर गुंतवणुकीत केला तर, लवकरात लवकर मोठा फंड तयार होण्यास मदत होईल.
2. 15X15X15 म्हणजे एकूण 15 वर्षांसाठी सातत्याने केली जाणारी गुंतवणूक. त्यानंतर दुसरे 15 म्हणजे गुंतवणुकीचे 15000. त्याचबरोबर तिसरे 15 म्हणजे 15% मिळणारे व्याजदर.
3. दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे म्हणजेच 15 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 15000 रुपयांची मासिक एसआयपी केली आणि तुम्हाला वार्षिक व्याजदर 15% मिळाले तर एकूण पंधरा वर्षांत तुमच्या खात्यात 27,00,000 रुपयांची गुंतवणूक होईल. या पैशांवर 15% व्याज म्हणजेच तुमच्या खात्यात 74,52,946 रुपये जमा होतील. व्याजाची रक्कम आणि तुमच्या गुंतवणुकीची रक्कम मिळून 15 वर्षांत तुमच्याजवळ 1,01,52,946 रुपयांची रक्कम जमा होईल. समजा तुम्हाला पंधरा टक्के ऐवजी 12% टक्क्यांपर्यंत व्याजदर प्राप्त झाले तर, करोडपती होण्यासाठी तुम्हाला 17 वर्षांचा काळ लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | 15x15x15 Formula Thursday 09 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC