19 November 2024 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

AXIS Mutual Fund | SIP से मुमकिन है! अल्पावधीत पैसे अनेक पट वाढवणाऱ्या अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 योजनांची लिस्ट

AXIS Mutual Fund

AXIS Mutual Fund | अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड भारतातील टॉप म्युचुअल फंड हाऊस पैकी एक आहे. आणि यातील म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या काही योजनांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. या योजनांची माहिती जाणून घेऊ. (AXIS Mutual Fund Scheme, AXIS Mutual Fund SIP – Direct Plan | AXIS Fund latest NAV today | AXIS Mutual Fund latest NAV and ratings)

अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप डायरेक्ट ग्रोथ प्लॅन :
मागील.3 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 23.98 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाची आतापर्यंतची सर्वोत्तम सर्वोत्तम परतावा देणारी योजना आहे. स्मॉल कॅप म्युचुअल फंडातून मिळणारा परतावा शाश्वत नसतो. अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये खालील कंपन्याचा समावेश होतो. नारायण हृदयालय, फाइन ऑरगॅनिक्स, जेके लक्ष्मी सिमेंट आणि गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स, CCC सारख्या स्टॉकचा समावेश होतो. ही म्युचुअल फंड योजना मुख्यतः स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करते.

अ‍ॅक्सिस मिडकॅप डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड :
अ‍ॅक्सिस मिडकॅप डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचा सर्वात जास्त परतावा मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंड पैकी एक मानला जातो. मागील तीन वर्षात या म्युच्युअल फंडाने चांगली कामगिरी केली आहे. मागील तीन वर्षात या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 17.25 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. स्मॉल कॅप म्युचुअल फंडांप्रमाणे मिड कॅप म्युचुअल फंड देखील चांगला परतावा कमावून देतात. जर तुम्ही जोखीम न घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छित असाल तर स्मॉल कॅप आणि मिडकॅप पण तुम्ही टाळले पाहिजे, आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली पाहिजे. हे कमी अस्थिर आणि कमी जोकमीचे असू शकतात. अॅक्सिस मिडकॅप डायरेक्ट म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षात वार्षिक सरारारी 14.89 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

अ‍ॅक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज म्युचुअल फंड :
या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 17.18 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 27 जानेवारी 2023 रोजी या म्युचुअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 20.12 रुपये होते. हा फंड लार्ज आणि स्मॉल कॅप अशा दोन्ही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. अॅक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज फंडाचे सर्वाधिक होल्डिंग बजाज फायनान्स, अव्हेन्यू सुपरमार्केट, या सारख्या लार्जकॅप कंपन्याच्या शेअर्समध्ये आहे. पीआय इंडस्ट्रीज, चोलामंडलम इत्यादी मिडकॅप स्टॉकमध्ये ही त्यांनी गुंतवणूक केली आहे. मिडकॅप शेअरमध्ये त्यांच्या पोर्टफोलिओचा सर्वाधिक वाटा गुंतवला गेला आहे.

अ‍ॅक्सिस निफ्टी 100 इंडेक्स फंड :
अ‍ॅक्सिस निफ्टी 100 इंडेक्स फंड डायरेक्ट प्लॅनने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 13.74 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडामे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस सारख्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या म्युचुअल फंडाची काही होल्डिंग्स रोख स्वरूपात तर उर्वरित कर्ज स्वरूपात गुंतवले आहेत. अॅक्सिस म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीपैकी एक आहे. या म्युच्युअल फंड हाऊसची स्थापना 2009 मध्ये झाली होती. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. अॅक्सिस म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीसाठी इक्विटी फंड, हायब्रीड फंड, डेट फंड यासारख्या म्युचुअल फंडाची विविधता मिळवून देतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | AXIS Mutual Fund schemes latest NAV on 01 April 2023.

हॅशटॅग्स

Axis Mutual fund(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x