Axis Mutual Fund SIP | बँक किंवा पोस्ट ऑफिस पेक्षा ही म्युच्युअल फंड योजना SIP तून 28 लाख रिटर्न देतेय, नाव नोट करा, पैसा वाढवा

Axis Mutual Fund SIP | सध्याच्या काळात आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंड हा असाच एक गुंतवणूक पर्याय आहे, जो गुंतवणूकदारांना दीर्घकाळात भरघोस परतावा कमावण्याची संधी देतो. म्युचुअल फंड हा एक अतिशय सोपा आणि सरळ गुंतवणूक पर्याय म्हणून लोकप्रिय झाला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका म्युचुअल फंड स्कीमची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. यासोबतच म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करून लोकांना कर सवलत लाभही मिळतो. आपण ज्या म्युच्युअल फंड योजनेची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे, “अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड”.
अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड स्कीम आहे. या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लावले जातात. 29 नोव्हेंबर 2013 रोजी अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड इन्व्हेस्टमेंट या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. ही म्युचुअल फंड स्कीम सुरू होऊन आता 9 वर्षे उलटून गेली आहेत. व्हॅल्यू रिसर्च फर्मने या म्युच्युअल फंड योजनेला 5 स्टार रेटिंग देऊन बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्निंगस्टारने या म्युचुअल फंडला 4 स्टार रेटिंग दिली आहे. या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 23.18 CAGR परतावा मिळवून दिला आहे.
अल्पावधीत मजबूत परतावा :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड स्कीमने आपल्या गुंतवणूकदारांना 8.28 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या प्रकरणात, 10,000 रुपयांची गुंतवणूकीवर 10,828 रुपये परतावा मिळाला आहे. मागील तीन वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 27.71 टक्के CAGR परतावा दिला आहे. या प्रकरणात, तीन वर्षांपूर्वी जर तुम्ही यात 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 20,845 रुपये फायदा झाला असता.
दुसरीकडे, पाच वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 10,000 रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची गुंतवणूक वाढून 24,680 रुपये झाली आहे. या परिस्थितीत लोकांनी गेल्या पाच वर्षात 23.18 टक्के CAGR परतावा कमावला आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी या म्युचुअल फंडाच्या सुरुवातीला 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 63,180 रुपये झाले आहे.
SIP मध्ये गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना SIP च्या माध्यमातून सरासरी वार्षिक 20.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशा परिस्थितीत, 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपी गुंतवणुकीद्वारे 8 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 10.70 लाख रुपये झाली असती. 8 वर्षात तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 28 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.
दुसरीकडे, जर आपण एका वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर SIP गुंतवणुकीवर या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना 9.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. या प्रकरणात, 1.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.26 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, तीन वर्षांच्या कालावधीत या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरासरी वार्षिक 30.85 टक्के परतावा मिळाला आहे. या प्रकरणात 3.60 लाखा रुपये गुंतवणुकीवर एकूण 5.59 लाख रुपये परतावा मिळाला आहे. मागील 5 वर्षात या म्युच्युअल फंड स्कीमने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 25.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशा परिस्थितीत 6 लाखाच्या गुंतवणूकीवर लोकांनी 11 लाख रुपये परतावा मिळवला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Axis Mutual Fund Small Cap Fund SIP return on investment benefits on 16 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK