13 January 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा
x

Child Mutual Fund SIP | तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी 3 म्युच्युअल फंड योजना; महिना 5000 SIP वर मिळतील 1 कोटी रुपये

Child Mutual Fund SIP

Child Mutual Fund SIP | प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी असते. एक हुशार, स्मार्ट आणि शिकलेले दांपत्य आपल्या मुलांसाठी लवकरात लवकर फायनान्शिअल प्लॅनिंग करून ठेवतात. मुलाच्या शिक्षणासाठी तसेच त्याच्या परदेशातील इतर काही खर्चासाठी, लग्न खर्चासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करतात.

तुम्ही तुमच्या मुलांसाठी अगदी छोटी रक्कम गुंतवून कोटींच्या घरात फंड जमा करून ठेवू शकता. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी मोठा कॉर्पस तयार करून ठेवायचा असेल तर, तुमच्यासाठी SIP गुंतवणुकीचे माध्यम फायद्याचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एकूण 3 अशा चाइल्ड म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी 5000 महिना जमा रक्कमेवर 1 कोटी रुपयांचा कॉर्तयारयार होऊ शकतो.

1) आयसीआयसीआय प्रूडेंशियल चाइल्ड केअर फंड :

आयसीआयसीआय प्रूडेंशियल चाइल्ड केअर फंड हा तुमच्या लहान मुलांसाठी अत्यंत फायद्याचा इक्विटी फंड ठरू शकतो. या फंडाची सुरुवात 2001 पासून सुरू झाली होती. म्हणजेच या अत्यंत जुन्या फंडाणे एकरक्कमी गुंतवणूकदारांना 15.94% परतावा मिळवून दिला आहे. त्याचबरोबर एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधून 14.76% टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. फंडाचे एक्स्पेन्स रेश्यो 2.20% असून तुम्ही या फंडात 5 वर्ष पैसे गुंतवू शकता.

5000 SIP चे कॅल्क्युलेशन :

एकूण 23 वर्षांत SIP माध्यमातून वार्षिक परतावा 14.76% आहे. तर, प्रत्येक महिन्याला तुम्ही 5000 रुपये गुंतवत असाल तर, ही 23 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 13,80,000 रुपये जमा होतात. याचाच अर्थ 23 वर्षांनंतर SIP गुंतवणुकीची व्हॅल्यू 99,53,989 रुपयांचा फंड तयार होईल.

एकरक्कमी गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :

फंडाच्या सुरुवातीपासूनचे एकरक्कमी गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन सांगायचे झाले तर, ICICI प्रूडेंशियल चाइल्ड केअर फंडाने वार्षिक परतावा 15.94% मिळवून दिला आहे. समजा एखाद्या व्यक्तीने सुरुवातीपासून 1 लाख रुपयांची रक्कम जमा केली असेल तर, आतापर्यंत हे पैसे 30,84,200 रुपये झाले असते. म्हणजेच फंडाने गुंतवणूकदारांना एकूण 30 पटीने जास्तीचा फायदा मिळवून दिला आहे.

2) HDFC चिल्ड्रन फंड रेगुलर प्लॅन :

एचडीएफसीचा चिल्ड्रन फंड रेगुलर प्लॅन 2021 साली सुरू झाला आहे. या फंडाने एक रक्कम गुंतवणुकीवर 16.76% वार्षिक परतावा दिला आहे.
त्याचबरोबर SIP च्या माध्यमातून 23 वर्षांत 16.2% वार्षिक परतावा दिला आहे. ज्या व्यक्तींना जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत पैशांची गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी एचडीएफसीचा हा फंड फायदेशीर ठरू शकतो.

SIP आणि एक रक्कमी गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन पहा :

समजा एखाद्या व्यक्तीने SIP च्या माध्यमातून 23 वर्षांसाठी 5000 रुपयांची रक्कम गुंतवली असती तर, 16.2% नुसार 13,80,000 रुपये जमा झाले असते. याचाच अर्थ एसआयपीच्या माध्यमातून 1,22,99,207 रुपयांचा फंड तयार झाला असता.

समजा एखाद्या व्यक्ती एचडीएफसी च्या या म्युच्युअल फंडमध्ये एक रक्कमी रक्कम गुंतवत असेल तर, 16.76% या ठरलेल्या व्याजदरानुसार 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे आतापर्यंत 38,63,717 रुपये जमा झाले असते. म्हणजेच एकूण 39 पटीने जास्त रिटर्न मिळाले असते.

3) टाटा यंग सिटीझन फंड :

टाटा यंग सिटीझन फंडने 5000 रुपयांच्या एसआयपीचे 1.7 कोटी रुपये बनवले आहेत. समजा या फंडमध्ये तुम्ही 23 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी केली असेल तर आणि वार्षिक परतावा 13.17% असेल तर, एकूण गुंतवणूक 17,40,000 रुपये जमा होतात. 29 वर्षानंतर SIP गुंतवणुकीची व्हॅल्यू 1,71,20,621 एवढी होईल.

समजा तुम्ही या फंडमध्ये एक रक्कम गुंतवणूक करत असाल तरी किती रुपयांचा फंड जमा होईल

या फंडाची सुरुवात 14 ऑक्टोबर 1995 साली सुरू झाला आहे. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या फंडाचे वार्षिक रिटर्न 13.24% एवढे मिळाले आहेत. समजा तुम्ही त्याकाळी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता 36,81,255 रुपये जमा झाले असते. म्हणजेच तुम्हाला एकूण 37 पटीने अधिक रक्कम मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Child Mutual Fund SIP Saturday 07 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Child Mutual Fund SIP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x