15 January 2025 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

Gold ETF Funds | 500 रुपयांमध्ये करा सोने खरेदी, गुंतवणुकीचा हा पर्याय तुम्हाला देईल जबरदस्त नफा

Gold ETF Funds

Gold ETF Funds | मार्केट मध्ये तुम्हाला खूप सारे सोनेखरेडीच्या योजना आणि डिस्काउंट मिळतील. त्यात सर्वात भारी म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड. ही एक चांगल्या परताव्याची सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये वास्तविक सोने जवळ बाळगण्याची गरज नाही.

भारतीय लोक सोने खरेदीसाठी नेहमीच उत्सुक :
जगात भारतीय लोक असे आहेत की जे सोने खरेदीसाठी नेहमीच उत्सुक असतात. प्रत्येक सणा सुधीला भारतीय लोक सोने खरेदी करत असतात. भारतीय समाजात सोने खरेदी करणे हे समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे. सोने हे सुरक्षित गुंतवणूक देखील आहे. सोन्यामध्ये करण्यात येणारी गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते. भारतीय समाजत आणि संस्कृतीमध्ये सोन्याचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेअर मार्केटमध्ये तेजी असो किंवा मंदी गुंतवणूकीच्या हिशोबाने सोने हे सर्वात सुरक्षित धन मानले जाते. त्यामुळे शेअर मार्केटबरोबरच सोन्यात देखील गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असतात. तज्ञ आणि आर्थिक सल्लागार तसेच गुंतवणूक करणारे लोकं आपल्या पोर्टफोलिओमध्ये नेहमीच १५-२ टक्के सोने असावे असा सल्ला देतात.

इतर पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत चालला :
सध्याच्या काळात वास्तविक सोने खरेदी करून घरात ठेवणे अडचणीचे असू शकते असे करण्यापेक्षा इतर पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत चालला आहे. कारण वास्तविक सोने खरेदी करणे आणि घरात ठेवणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्याला इतर पर्याय देखील आहेत जसे गोल्ड बॉंड, गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. गोल्ड म्युच्युअल फंड ही चांगल्या परताव्याची सुरक्षित गुंतवणूक आहे. यामध्ये वास्तविक सोने सोबत बाळगण्याची गरज नसते. अनेक गोल्ड म्युच्युअल फंड असे आहेत. की त्यांनी फिक्स डिपॉसिटपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे.

५०० रुपयांमध्ये सोने खरेदी करा:
गोल्ड म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूकीचा सर्वाधिक फायदा हा आहे की, तुम्हाला कमीत कमी ५०० रुपयांपासून सोने खरेदीची सुरुवात करू शकता. तसेच तुम्ही दरमहा SIP च्या माध्यमातून गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये म्युच्युअल फंड सारखीच गुंतवणूक करावी लागते आणि परतावा देखील आकर्षक मिळतो.

गोल्ड फंडची भली मोठी यादी :
तुम्हाला मार्केट मध्ये गोल्ड फंडची भली मोठी यादी भेटेल पण तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हाला काही बेस्ट गोल्ड फंड ची नावे सांगत आहोत. एक्सिस गोल्ड फंड (Axis Gold Fund), कोटक गोल्ड फंड (Kotak Gold Fund), एसबीआई गोल्ड फंड (SBI Gold Fund) आणि एचडीएफसी गोल्ड फंड (HDFC Gold Fund) हे काही गोल्ड फंड आहेत जे जबरदस्त परतावा देतात आणि सुरक्षित गुंतवणुक म्हणून ओळखले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold ETF Funds for Rs 500 check details here 18 July 2022.

हॅशटॅग्स

#Gold(31)#Gold ETF(17)mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x