16 April 2025 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

HDFC ETF Scheme | एचडीएफसीने 3 स्मार्ट ईटीएफ गुंतवणूक योजना सुरू केल्या, फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करून पैसा वाढवा

HDFC ETF scheme

HDFC ETF Scheme | HDFC अॅसेट मॅनेजमेंट कंपनी जिला आपण थोडक्यात HDFC AMC म्हणून देखील ओळखतो, या कंपनीने नुकताच ‘निफ्टी 100 क्वालिटी 30 ETF’, ‘निफ्टी 50 व्हॅल्यू 20 ETF’ आणि ‘निफ्टी ग्रोथ सेक्टर्स 15 ETF’ असे तीन बीटा ईटीएफ गुंतवणूक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

HDFC अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने गुंतवणूक क्षेत्रात आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीची नवीन संधी देण्यासाठी निफ्टी 100 क्वालिटी 30 ETF, निफ्टी 50 व्हॅल्यू 20 ETF आणि निफ्टी ग्रोथ सेक्टर्स 15 ETF ya नवीन योजना सुरू करण्याची तयारी केली आहे. या सर्व योजना लवकरच सुरू होतील अशी घोषणा कंपनी ने केली आहे. HDFC AMC कंपनीने या योजनांची घोषणा करून आपल्या म्युचुअल फंड इंडेक्स सोल्यूशन्सचा विस्तार आणखी मोठा केला आहे. 9 ते 20 सप्टेंबर 2022 दरम्यान या तीन ETF योजनासाठी न्यू फंड ऑफर (NFO) सुरू करण्यात येईल. आणि HDFC AMC कंपनीने या सर्व योजनेचे फंड व्यवस्थापक म्हणून “कृष्णन कुमार डागा” यांची नियुक्ती केली आहे.

या योजनांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गुंतवणूक आणि मालमत्तामध्ये कमालीची वाढ होत आहे. HDFC मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे संचालक म्हणतात, की स्मार्ट बीटा गुंतवणूक योजना जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय होत चालली आहे. HDFC AMC अंतर्गत गुंतवणूक मालमत्तामध्ये सतत वाढ होत आहे. स्मार्ट बीटा ईटीएफ योजना आपल्या गुंतवणूकदारांना “वन शॉट डायव्हर्सिफिकेशन” ऑफर करत आहेत. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीची स्मार्ट बीटा इन्व्हेस्टमेंट योजना ही ज्यांना दीर्घकालीन परतावा हवा कमवायचा आहे, अश्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगली आहे .

किमान गुंतवणूक मर्यादा :
एनएफओ म्हणजेच न्यू फंड ऑफरच्या कालावधीत सुरुवातीला योजनेमध्ये किमान गुंतवणूक 500 रुपये पासून गुंतवणूक करता येईल. आणि योजनांमध्ये कोणतेही एक्झिट लोड चार्ज आकारले जाणार नाही. निफ्टी 100 क्वालिटी 30 इंडेक्समध्ये गुणवत्ता गुणांच्या आधारे निवडलेल्या निफ्टी 100 निर्देशांकातील दिग्गज 30 कंपन्यांचा समावेश होतो. प्रत्येक कंपनीची गुणवत्ता आणि गुंतवणूक दर्जा त्या कंपनीच्या रिटर्न ऑन इक्विटी (ROE), फायनान्शियल लिव्हरेज इक्विटी प्रमाण, आणि EPS ग्रोथ व्हेरिएबिलिटीच्या आधारे ठरवले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC AMC Has declared three smart ETF Bita scheme for long term investors on 14 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HDFC AMC(1)HDFC ETF scheme|(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या