22 February 2025 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

HDFC Mutual Fund | एचडीएफसीने 2 नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच केल्या, फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता, अधिक जाणून घ्या

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | HDFC AMC कंपनीने नुकताच आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन ‘स्मार्ट बीटा ईटीएफ’ बाजारात आणले आहेत. यामध्ये HDFC निफ्टी 200 मोमेंटम 30 ETF आणि HDFC निफ्टी 100 लो व्होलॅटिलिटी 30 ETF यांचा समावेश आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त 500 रुपये जमा करावे लागेल. 26 सप्टेंबर 2022 पासून हे NFO बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुले केले जातील. 6 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणूकदार या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. हे दोन्ही फंड स्कीम ओपन एंडेड फंड आहेत, याचा अर्थ तुम्ही तुमचे पैसे तुम्हाला हवे तेव्हा काढून घेऊ शकता. HDFC AMC ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, स्मार्ट बीटा फंड गुंतवणुकीत, स्टॉकची निवड फंडच्या आकारापेक्षा त्यातील मूलभूत घटकांच्या आधारे केली जावी. या गुंतवणूक धोरणचा अवलंब केल्यास मोठ्या बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांपेक्षा जोखीम-समायोजित परतावा असलेल्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर असू शकते.

Smart Beta ETF :
HDFC Nifty 200 मोमेंटम 30 ईटीएफ आणि HDFC Nifty 100 लो व्होलॅटिलिटी 30 ETF ने अनुक्रमे निफ्टी 200 टीआरआय आणि निफ्टी 100 टीआरआय च्या तुलनेत दीर्घकाळात अधिक परतावा कमावून दिला आहे. या दोन्ही फंडस् ने निफ्टी 200, Nifty 100 आणि 50 TRIs च्या तुलनेत 1, 3, 5 आणि 10-वर्षांच्या उच्चांक पातळीवर अधिक सरासरी रोलिंग परतावा कमावून दिला आहे.

HDFC अॅसेट मॅनेजमेंट कंपनी स्टेटमेंट :
NFO च्या लॉन्चवर भाष्य करताना HDFC अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे ​​ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “स्मार्ट बीटा गुंतवणूक जागतिक गुंतवणूक बाजारात अतिशय लोकप्रिय आहे. जागतिक स्तरावर AUM मध्ये सातत्याने वाढ होत आहे. HDFC AMC च्या इंडेक्स सोल्यूशन ऑफरमध्ये विस्तार झाला असून त्यातील गुंतवणुकीतून लोकांनी भरघोस परतावा कमावला आहे. स्मार्ट बीटा ईटीएफ मध्ये गुंतवणूक केल्यास हे तुम्हाला कमी खर्चात पोर्टफोलिओचे वन-शॉट विविधिकरण करण्यास मदत करतात आणि ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन परतावा हवा आहे त्यांच्यासाठी हे स्मार्ट बीटा फंड फायदेशीर राहील.

NFO चा कालावधी :
HDFC AMC ने या दोन नवीन स्मार्ट बीटा ETF फंड साठी NFO कालावधी 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान निश्चित केला आहे. गुंतवणूकदार आपल्या पसंतींनुसार त्यांच्या गुंतवणुकीत विविधता निर्माण करू शकतात. वेगवेगळ्या घटकांमधील बदल हे वेगवेगळ्या फंड च्या कामगिरीवर प्रभाव टाकत असते. जर तुम्ही या दोन्ही स्मार्ट बीटा ETF फंड मध्ये गुंतवणूक करायचे ठरवले तर तुम्ही प्रति अर्ज कमीत कमी 500 रुपये जमा करून आणि त्यानंतर 1 रुपयेच्या पटीत गुंतवणूक वाढवू शकता. तज्ज्ञांच्या म्हणणयानुसार या दोन्ही गुंतवणूक योजनांमध्ये जोखीम खूप जास्त आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक सल्लागारांचा आणि गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नये.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC Mutual fund has launched new Smart Beta ETF fund for investment on 29 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x