23 February 2025 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

HDFC Mutual Fund | एचडीएफसी फंडाची ही योजना गुंतवणूकदारांचं आयुष्यं बदलते आहे, 1 लाखावर 56 लाख परतावा, हा फंड लक्षात ठेवा

Highlights:

  • HDFC Mutual fund
  • टॉप म्युच्युअल फंड योजना – HDFC Top 100 Fund
  • एकूण दिलेला परतावा
HDFC Mutual fund

HDFC Mutual fund | HDFC टॉप 100 फंड ही म्युच्युअल फंड योजनेच्या टॉप परफॉर्मरमध्ये लार्ज कॅप सेगमेंटमध्ये शीर्षस्थानी आहे. HDFC टॉप 100 फंड ही इतर सर्व म्युच्युअल फंड योजनेच्या तुलनेत टॉप परफॉर्मरमध्ये लार्ज कॅप सेगमेंटमध्ये अग्रणी आहे. या म्युचुअल फंडाने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देऊन करोडपती केले आहे.

टॉप म्युच्युअल फंड योजना – HDFC Top 100 Fund

हा HDFC चा म्युचुअल फंड लाँच होऊन तब्बल 24 वर्षे झाली आहेत आणि लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत या फंड बने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 18.34 टक्के वार्षिक सरासरी दराने परतावा मिळवून दिला आहे. लॉन्चच्या वेळी जर तुम्ही या म्युचुअल फंडात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 56 लाख रुपयांच्या वर झाले असते. उपलब्ध डेटानुसार, मागील 20 वर्षाच्या काळात लार्जकॅप सेगमेंटमध्ये भरघोस परतावा देणाऱ्या म्युचुअल फंडच्या यादीत HDFC चे म्युचुअल फंड अव्वल स्थानावर आहे.

* लॉन्चची तारीख : 11 ऑक्टोबर 1996
* लाँच झाल्यापासून आतापर्यंत देलेला सरासरी वार्षिक परतावा : 18.34 टक्के
* 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिलेला एकूण परतावा मूल्य: 56.9 लाख रुपये

एकूण दिलेला परतावा

HDFC Top 100 Fund बद्दल बोलायचे झाले तर, लाँच झाल्यापासून आतापर्यंत मागील 24 वर्षात या म्युचुअल फंड ने सरासरी 18.34 टक्के प्रतिवर्ष परतावा दिला आहे. मागील 20 वर्षात 18.19 टक्के, 10 वर्षात 13.52 टक्के कमावले आहेत. मागील 7 वर्षात 8.25 टक्के आणि 5 वर्षात 6.76 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. कोविड 19 मुळे,गेल्या वर्षीपासून आणि त्याआधीच्या 3 वर्षांच्या परताव्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे.

20 वर्षांत मिळालेला एकूण परतावा
* 20 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 28.29 लाख
* 20 वर्षांत 10000 मासिक SIP चे मूल्य : 1.74 कोटी

* 15 वर्षांत परतावा
* 15 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 7.24 लाख
* 15 वर्षात 10000 मासिक SIP चे मूल्य : 42.30 लाख

10 वर्षांत परतावा
10 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 2.21 लाख
10 वर्षात 10000 मासिक SIP चे मूल्य : 18.49 लाख

5 वर्षांत परतावा
* 5 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य: 1.39 लाख
* 5 वर्षात 10000 मासिक SIP चे मूल्य : 6.73 लाख

किमान गुंतवणूक मर्यादा

HDFC टॉप 100 म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही किमान 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, जर तुम्हाला त्यात SIP करायची असेल, तर त्याची किमान दरमहा 500 रुपये जमा करावे लागेल.

मालमत्ता आणि खर्चाचे प्रमाण

HDFC म्युच्युअल फंड या योजनेचा बेंचमार्क NIFTY 100 आहे. हा एक ओपन एंडेड फंड आहे. 31 जुलै 2020 रोजी म्युचुअल फंडची एकूण मालमत्ता 16,202 कोटी रुपये होती. आणि 31 जुलै 2020 पर्यंत फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.78 टक्के होते. तथापि, ही म्युचुअल फंड योजना एक लार्ज कॅप इक्विटी फंड योजना असल्याने, जोखीम मध्यमपेक्षा थोडा जास्त आहे.

टॉप गुंतवणूक

HDFC म्युचुअल फंड ची गुंतवणूक शेअर बाजारातील दिग्गज कंपनी जसे इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयटीसी, एसबीआय या मध्ये मोठ्या प्रमाणत आहे. या म्युचुअल फंडाची गुंतवणूक फायनान्स आणि ऊर्जा क्षेत्रात देखील सर्वाधिक आहे. याशिवाय HDFC म्युचुअल फंडने तंत्रज्ञान, बांधकाम आणि एफएमसीजी क्षेत्रातही मजबूत गुंतवणूक केलेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC Mutual fund investments benefits on 13 Oct0ber 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x