17 April 2025 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

HDFC Mutual Fund | एचडीएफसीने नवीन म्युच्युअल फंड योजना लॉन्च केली, योजना समजून घ्या आणि गुंतवणुकीचा विचार करा

HDFC Mutual fund NFO

HDFC Mutual fund NFO | HDFC सिल्व्हर ETF म्युचुअल फंडाची नवीन एक फंड ऑफर बाजारात आली आहे. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत ही योजना गुंतवणुकीसाठी खुली राहील. हा म्युचुअल फंड 7 ऑक्टोबर 2022 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. HDFC सिल्व्हर ETF FOF च्या या योजनेचे नाव “HDFC ओपन-एंडेड FOF योजना” असून, या माध्यमातून HDFC सिल्व्हर ETF मध्ये गुंतवणूक केली जाईल. HDFC AMC ने एका मीडिया रिलीजमध्ये नवीन म्युचुअल फंड योजना जाहीर केल्याची माहिती दिली आहे.

गुंतवणूकीची संधी :
या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्व वर्गातील गुंतवणूकदारांना संधी मिळेल. ही नवीन फंड ऑफर सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी खुली असेल. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खात्याची सुध्दा गरज लागणार नाही. या म्युचुअल फंड योजनेत SIP, STP सारखे स्मार्ट गुंतवणूक पर्याय देखील उपलब्ध आहेत. HDFC सिल्व्हर ETF म्युचुअल फंडात तुम्ही छोटी रक्कम देखील गुंतवू शकता. HDFC सिल्व्हर ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करून गुंतवणूक मूल्य वाढवणे, हे या म्युचुअल फंडाचे उद्दिष्ट आहे.

सिल्व्हर ETF गुंतवणूक :
चांदीची खरेदी करणे आणि ते सुरक्षित ठेवणे थोडे कठीण असते. त्यामुळे HDFC सिल्व्हर ETF FOF NFO madhe गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांद्वारे चांदीमध्ये गुंतवणूक करता येते. या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांदी खरेदी करून साठवून ठेवण्याची गरज नाही.

गुंतवणुकीचे फायदे : HDFC AMC लिमिटेडचे ​​अधिकारी या योजनेबद्दल माहिती देताना म्हणाले की, HDFC सिल्व्हर ETF FOF गुंतवणूकदारांना चांदीमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची संधी देते. ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूकदारांना थेट चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. ही नवीन युगातील गुंतवणूक योजना चांदीमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याची संधी प्रदान करते. HDFC AMC ही भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड संस्थापैकी एक आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत HDFC AMC ची मालमत्ता 4.22 ट्रिलियन रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC Mutual fund NFO has been launched to invest in Digital Silver for high returns on investment on 13 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HDFC Mutual fund NFO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या