15 January 2025 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

HDFC Mutual Fund | टॉप रेटिंग HDFC म्युचुअल फंडाच्या 4 योजना, तुमची गुंतणूक वेगाने वाढवा, सुवर्ण संधी सोडू नका

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, कोणती योजना सर्वोत्तम परतावा देते, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्या आधी योजनेबद्दल सखोल संशोधन करा. चांगली योजना निवडण्याचा एक मार्ग म्हणजे त्याची रेटिंग तपासणे. म्युचुअल फंडची रेटिंग चांगली असेल तर तो म्युचुअल फंड चांगला आहे, असे मानले जाते. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अशा 4 योजना आहेत, ज्यांना रेटिंग एजन्सी क्रिसिलने क्रमांक 1 ची रेटिंग दिली आहे. CRISIL ने अनेक मापदंड निश्चित करून त्या आधारावर या योजनांना क्रमांक 1 ची रेटिंग दिली आहे.

योजनांची लिस्ट : एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या खालील योजना क्रिसिलने क्रमांक 1 ची रेटिंग दिली आहे.
1) एचडीएफसी टॉप 100 फंड
2) एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंड
3) एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड
4) एचडीएफसी फोकस्ड 30 फंड

3 वर्षाचा परतावा :
बहुतेक म्युच्युअल फंड योजना या 3 वर्षात जबरदस्त परतावा देतात. कारण कोविड आल्यानंतर शेअर बाजार क्रॅश झाला होता, आणि त्यानंतर बाजार झपाट्याने वाढला आहे. यामुळे बहुतांश म्युच्युअल फंड योजनांनी जबरदस्त परतावा दिला आहे. पुढील 3 वर्षात म्युचुअल फंड योजना असाच परतावा देतील याची शाश्वती नाही. मुदत ठेवींमधूनही गुंतवणूक चांगला आणि सुरक्षित परतावा कमवू शकतात.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रथम जोखमीबद्दल संशोधन करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही जोखीम न घेणारे गुंतवणूकदार असाल तर तुम्ही डेट फंड विभागातील कमी जोखीम असलेले म्युचुअल फंड पर्याय शोधले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही वर्षात इक्विटी म्युच्युअल फंड हे बँक ठेवींच्या बरोबरीने परतावा देतील. जे लोक आता म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत, ते पुढील काळात भरीव नफा कमवू शकतात. मागील एका वर्षभरात शेअर बाजाराने काही कामगिरी केली नाही. त्यामुळे परतावा सपाट राहिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत म्युचुअल फंडमधील परताव्याचा अंदाज लावणे नेहमीच कठीण असते. त्यामुळे योग्य संशोधन करूनच गुंतवणूक केली पाहिजे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Mutual Fund opportunity and return in investment check details on 10 March 2023.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x