22 November 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

HDFC Mutual Fund | HDFC बँक एफडी पेक्षा एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, 500 रुपये SIP

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वता मोठी बँक म्हणजेच एचडीएफसी बँक म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. एचडीएफसी म्युच्युअल फंड AMC कंपनीद्वारे हा म्युचुअल फंड व्यवसाय चालवला जातो. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करते. मुख्यतः एचडीएफसी म्युचुअल फंड योजना इक्विटी आणि डेट फंडयांमध्ये गुंतवणूक करते. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांवर गुंतवणूकदारांचा पक्का विश्वास आहे. आपण एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनेत मिळणाऱ्या परताव्याचे अंदाज चार्टवरून लावू शकतो. एचडीएफसी च्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी अवघ्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. या योजनांचे खास वैशिष्ट म्हणजे तुम्ही फक्त 500 रुपये जमा करून एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करु शकता.

1) एचडीएफसी स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
एचडीएफसी स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 22.24 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या योजनेने अवघ्या पाच वर्षात 1 लाख रुपयांवर 2.73 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. तर, 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केल्यास मुदत पूर्ण झाल्यावर 11.40 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत तुम्ही किमान एकरकमी गुंतवणुक रक्कम मर्यादा 5000 रुपये आहे, तर SIP साठी 500 रुपये आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी स्मॉल कॅप म्युचुअल फंडाची यून मालमत्ता 13,649 कोटी रुपये होती, तर त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.83 टक्के होते.

2) HDFC रिटायरमेंट सेव्हिंग फंड इक्विटी योजना :
एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग फंड इक्विटी प्लॅनने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्यांना लोकांनी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना मागील पाच वर्षांत 2.42 लाख रुपये परतावा मिळाला आहे. तर, ज्यांना लोकांनी दरमहा 10,000 मासिक SIP गुंतवणूक केली होती त्यांना सध्या 10.60 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत तुम्ही किमान एकरकमी 5000 रुपये जमा करू शकता अंक एसआयपी मध्ये किमान 500 रुपये जमा करू शकता. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी सेवानिवृत्ती बचत निधी इक्विटी प्लॅनची एकूण मालमत्ता 2,029 कोटी रुपये होती, तर या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.91 टक्के होते.

3) एचडीएफसी इंडेक्स फंड – सेन्सेक्स योजना :
एचडीएफसी इंडेक्स फंड सेन्सेक्स प्लॅनने मागील 5 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांना मागील पाच वर्षांत 2.32 लाख रुपये परतावा मिळाला आहे. तर ज्या लोकांनी दरमहा 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 9.79 लाख रुपये झाले आहे. या योजनेची किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा रक्कम 5000 रुपये आहे. तर किमान 500 रुपये जमा करून SIP गुंतवणूक सुरू करता येते. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी इंडेक्स फंड सेन्सेक्स योजनेची AUM 2,915 कोटी रुपये होती, तर योजनेच्या खर्चाचे प्रमाण 0.20 टक्के होते.

4) एचडीएफसी इंडेक्स फंड निफ्टी 50 योजना :
एचडीएफसी इंडेक्स फंड निफ्टी 50 प्लॅनने मागील 5 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 17.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना मागील पाच वर्षांत 2.25 लाख रुपये परतावा मिळाला आहे. तर, ज्यां लोकांनी या योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती त्यांना आज 9.71 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत तुम्ही किमान एकरकमी 5000 रुपये जमा करू शकता, तर SIP गुंतवणूक करण्यासाठी किमान 500 रुपये जमा करावे लागतील. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी इंडेक्स फंड निफ्टी 50 प्लॅनची AUM 4,434 कोटी रुपये होती, तर या योजनेचे खर्चाचे प्रमाण 0.20 टक्के होते.

5) एचडीएफसी मिड-कॅप संधी निधी :
एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 17.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांना मागील पाच वर्षांत 2.21 लाख रुपये परतावा मिळाला आहे. तर ज्या लोकांनी या योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली होती, त्यांच्या पैशाचे मिकी वाढून आता 10.18 लाख रुपये झाले आहे. या योजनेत तुम्ही किमा एकरकमी 5000 रुपये जमा करू शकता, तर SIP गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागतील. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाचे AUM 31,442 कोटी रुपये होते, तर योजनेच्या खर्चाचे प्रमाण 0.98 टक्के होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC Mutual Fund Schemes latest NAV check details on 16 January 2023.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x