4 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, शेअर प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा - IPO Watch Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फायदा कुठल्या योजनेत, बँक FD की SCSS योजना, रक्कम जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, यावेळी महागाई भत्त्यात होणार वाढ, बेसिक सॅलरी प्रमाणे इतकी वाढ होणार Horoscope Today | आज काही राशींच्या विद्यार्थ्यांना एक चांगला शैक्षणिक मार्ग मिळेल तर, अनेकांची दैनंदिन कामे चोखपणे पार पडतील Quant Mutual Fund | जबरदस्त योजना, रु.150 SIP बचतीवर मिळतील 2 कोटी रुपये, तर एकरकमी बचतीवर 31 पट परतावा मिळेल EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
x

HDFC Mutual Fund | बिनधास्त SIP करा या योजनेत, 2000 रुपयांच्या बचतीवर कोटींच्या घरात परतावा मिळेल, फंडाविषयी जाणून घ्या

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | तुम्ही एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे नाव आतापर्यंत अनेक वेळा ऐकलं असेल. कारण की हा फंड भारताच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जुना म्युच्युअल फंडांपैकी एक मानला जातो. या योजनेने गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. ही योजना एक प्रकारचा फंड आहे ज्याचं नाव ‘एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड’ असं आहे.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे केवळ 2,000 हजार रुपये यांच्या एसआयपीने एकूण 30 वर्षांमध्ये 2 कोटींचा आकडा गाठला आहे. एचडीएफसी ही योजना एवढी भन्नाट आहे की, केवळ एसआयपीस नाहीतर एक रक्कमी गुंतवणुकीतून देखील बंपर परतावा मिळवून दिला आहे.

एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड  – योजनेविषयी आणखीन माहिती जाणून घेऊया :

1. एचडीएफसीचा हा फंड अत्यंत जुना फंड असून हा एक ओपन इंडेड इक्विटी म्युच्युअल फंड आहे. हा फंड 1994 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत फंडाने गुंतवणूकदारांना भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे.

2. एचडीएफसीची ही योजना एखाद्या मल्टीकॅप फंडाप्रमाणे काम करते. म्हणजेच यामध्ये छोट्यापासून ते मोठमोठ्या कंपन्यांचे स्टॉक्स शामिल असतात. या फंडाचा हा ही एक मोठा फायदा होतो तो म्हणजे गुंतवणूकदाराला आपल्या पोर्टफोलिओमधून डायव्हर्सिफिकेशनचा लाभ उचलता येतो.

3. एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंडने मागील काही वर्षांमध्ये जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या फंडावर जास्त जास्त पैसे खर्च करताना किंवा गुंतवणूक करताना दिसत आहेत. या फंडाणे गुंतवणूकदारांना एका वर्षात 48% कंपाऊंडिंग ग्रोथ रेटसह चांगले प्रदर्शन दर्शवले आहे.

4. त्याचबरोबर एचडीएफसीच्या या नावाजलेल्या फंडाने गेल्या 3 वर्षांत 21.12% CAGR आणि 5 वर्षांमध्ये 22.55% CAGR मिळवून दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund Wednesday 01 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x