18 April 2025 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Hybrid Mutual Funds | बाजारातील अस्थिर परिस्थितही हे 3 म्युचुअल फंड तगडा परतावा देत आहेत, नफ्याच्या फंडांची यादी सेव्ह करा

Hybrid mutual fund

Hybrid Mutual Funds | जागतिक शेअर बाजारातील अस्थिरतेपासून सुरक्षित राहण्यासाठी शेअर बाजार तज्ञ आणि बाजार विश्लेषक हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. हायब्रीड म्युचुअल फंडांच्या अनेक उपश्रेणी आहेत. अग्रेसिव हायब्रीड म्युचुअल फंड देखील हायब्रीड फंडांची एक गुंतवणूक श्रेणी आहे. यामध्ये तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता आणि प्रचंड मोठा परतावा मिळवू शकता.

अग्रेसिव म्युचुअल फंड :
हायब्रिड फंड ही म्युच्युअल फंडाची अशी एक योजना आहे जी शेअर्स आणि डेट मार्केटमध्ये पैसे गुंतवते. अग्रेसिव म्युचुअल फंड हा हायब्रीड फंडांचा उप-वर्ग आहे. अग्रेसिव म्युचुअल फंड त्यांच्या एकूण फंड पैकी 65 ते 80 टक्के रक्कम स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतात. ते उर्वरित रक्कम कर्ज साधनांमध्ये गुंतवतात. अॅग्रेसिव्ह हायब्रीड म्युचुअल फंड आपला बहुतांश पैसा अश्या इक्विटीमध्ये गुंतवतात, ज्यातून त्यांना बाजारातील तेजीचा जबरदस्त फायदा उचलता येईल. जेव्हा बाजार पडायला सुरुवात होते, तेव्हा हायब्रीड म्युचुअल फंडची त्याची कर्जातील गुंतवणूक नुकसान होण्यापासून वाचवते. या लेखात आम्ही तुम्हाला अश्या काही अग्रेसिव म्युचुअल फंडांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी मागील 15 वर्षांत SIP द्वारे गुंतवलेले पैसे तिप्पट केले आहेत.

क्वांट अॅब्सोल्युट म्युचुअल फंड :
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, या फंडाचे नाव पूर्वी एस्कॉर्ट बॅलन्स्ड फंड असे होते. एस्कॉर्ट्स एएमसी क्वांट एएमसीने हे फंडस् विकत घेतले. त्यानंतर हा निधी क्वांटकडे आला. तेव्हापासून ह्या म्युचुअल फंड ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ज्या लोकांनी मागील 15 वर्षात या म्युचुअल फंडात दरमहा 10,000 रुपयांची SIP केली होती, त्याची गुंतवणूक आज 63 लाख रुपये झाली आहे. ह्या म्युचुअल फंडाने गुंतवणूकदारांना तब्बल 15.4 टक्के परतावा दिला आहे.

ICICI प्रुडेंशियल इक्विटी आणि डेट फंड:
हा म्युचुअल फंडाचे जुने नाव पूर्वी ICICI प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंड असे होते. यामुळे दीर्घकाळासाठी पैसे लावलेले गुंतवणूकदार आता लखपती झाले आहेत. अग्रेसिव हायब्रीड फंड श्रेणीतील हा सर्वात जास्त परतावा देणाऱ्या फंडांपैकी एक आहे. मागील 15 वर्षात, SIP मोडमध्ये दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या लोकांची गुंतवणूक आता वाढून 62 लाख रुपये झाली आहे.

कॅनरा रोबेको इक्विटी हायब्रीड फंड :
या म्युचुअल फंडा ने मागील 15 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 13.5 टक्के इतका धमाकेदार परतावा दिला आहे. 15 वर्षासाठी दर महिन्याला 10,000 रुपये दराने SIP गुंतवणूक केल्यावर आता जवळपास 18 लाख रुपयांचा निधी गुंतवला गेला आणि या गुंतवणूकीवर 15 वर्षांत तब्बल 53.6 लाख रुपये इतका जोरदार परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hybrid mutual fund investment returns in long term period on 10 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hybrid mutual fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या