16 November 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL
x

ICICI Prudential Mutual Fund | आयसीआयसीआयच्या 5 धमाकेदार म्युचुअल फंड योजना, 1 वर्षात 133 टक्क्यांपर्यंत परतावा

ICICI prudential mutual fund schemes

ICICI Prudential Mutual Fund | या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे मागील एका वर्षात दुप्पट झाले आहेत. त्याच वेळी, असे अनेक म्युचुअल फंड योजना आहेत, ज्यांनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांचा पैसा चार पटींनी वाढवला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड:
देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ICICI बँकेद्वारे अनेक म्युचुअल फंड योजना चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता आणि आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. या खाजगी बँकेचा म्युच्युअल फंड व्यवसाय देखील भारतात सर्वात मोठा आहे. आणि ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड द्वारे चालवल्या जाणार्‍या अनेक योजना आहेत, ज्यांची गुंतवणूक कर्ज वितरण तसेच इक्विटी मार्केटमध्ये आहे. ICICI प्रुडेंशियलच्या अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी फक्त एका वर्षात 94 टक्के ते 133 टक्के परतावा दिला आहे. अशा काही योजनांची माहिती आपण पाहणार आहोत.

ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज फंड :
ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 133% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 100 रुपयांच्या SIP पासून आपण गुंतवणूक सुरू करू शकता. 31 ऑगस्ट 2021 रोजी ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज फंडाची मालमत्ता 675 कोटी रुपये होती आणि खर्चाचे प्रमाण 1.10 टक्के होते. ही योजना 15 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. ह्या फंडामार्फत प्रामुख्याने हिंडाल्को, टाटा स्टील, वेदांता, सेल, जिंदाल स्टेनलेस स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. वर्षभरापूर्वी या योजनेत जर आपण1 लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याचे मूल्य 2.33 लाख रुपये झाले असते.

ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड :
104% :
ICICI प्रुडेंशियल इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 104% परतावा दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 100 रुपयांची SIP सुरू केली जाऊ शकते. 31 ऑगस्ट 2021 रोजी ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंडची मालमत्ता 1,632 कोटी रुपये होती. आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण 1.79 टक्के होते. ह्या फंड मार्फत प्रामुख्याने भारती एअरटेल, एल अँड टी, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, ओएनजीसी सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.

ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड :
ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटी फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 99% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 100 रुपयांची SIP सुरू केली जाऊ शकते. 31 ऑगस्ट 2021 रोजी ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटी फंडची मालमत्ता 4,090 कोटी रुपये होती. आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.69 टक्के होते. ह्या फंड मार्फत प्रामुख्याने भारती एअरटेल, सन फार्मा, अॅक्सिस बँक, गेल, एनटीपीसी, ओएनजीसी, एसबीआयच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.

ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप फंड :
ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 97.91% परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत, किमान एकरकमी 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते, तर किमान 100 रुपयांची SIP सुरू केली जाऊ शकते. 31 ऑगस्ट 2021 रोजी ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप फंडाची मालमत्ता 2,961 कोटी रुपये होती. आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण सध्या 0.66 टक्के आहे. ह्या फंड मार्फत प्रामुख्याने महिंद्रा लाइफ स्पेस, व्ही-मार्ट, आयनॉक्स, बिर्लासॉफ्टच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.

ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 94.48% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते, तर किमान 100 रुपयांची SIP सुरू केली जाऊ शकते. 31 ऑगस्ट 2021 रोजी ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडची एकूण मालमत्ता 5,037 कोटी रुपये आहे. आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.96 टक्के आहे. ह्या फंड मार्फत प्रामुख्याने इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICICI Prudential Mutual Fund schemes for good return check detail 29 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x