15 January 2025 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

दररोज फक्त 17 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती, आजच या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात करा

Investment plan

Investment Plan | भविष्यातील आर्थिक नियोजन जितक्या लवकर सुरू कराल, तितके ते अधिक चांगले आहे. आजकाल ची आपली बदलती जीवनशैली आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च यांमध्ये वर्तमान आणि भविष्यकाळातही कठीण काळासाठी आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच तुम्ही आजचे तसेच उद्याचे योग्य आर्थिक नियोजन करायला हवे. त्यासाठी लवकर गुंतवणूक सुरुवात करा.

सर्वोत्तम गुंतवणूक योजना:
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी तुम्ही आर्थिक योजना तयार करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही अजून काही नियोजन केले नसेल, तर त्यावर तुम्हाला लवकरात लवकर काही तरी उपाय करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी तुम्ही आर्थिक तज्ञ किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. अशावेळी आम्ही तुम्हाला काही माहिती कामाची देणार आहोत, तुम्ही हा लेख वाचून गुंतवणुकीच्या काही कल्पना घेऊ शकता. गुंतवणुकीला सुरुवात केली तर अधिकच चांगले.

दररोज फक्त 17 रुपयांची बचत करा :
तुम्ही दररोज छोटी बचत करून गुंतवणूक केली तरी त्यातून चांगला मोठा फंड तयार होऊ शकतो. छोट्या गुंतवणुकीत तुम्ही मोठा फंड कसा बनवू शकता ते आपण पाहू. तुम्हाला दर महिन्याला फक्त 500 रुपये बचत करायचे आहेत. आणि या 500 रुपयांना चांगल्या योजनेत गुंतवणूक करायची आहे. जर तुम्ही दैनंदिन आधारावर विचार केला तर तुम्हाला दर रोज फक्त 17 रुपये बचत करायचे आहे. दररोज 17 रुपयांची बचत करणे ही काही मोठी गोष्ट नाही. दीर्घकाळात ही बचत तुम्हाला जबरदस्त परतावा देईल.

SIP वर चांगला परतावा येईल :
सुरुवातीला तुम्ही म्युच्युअल फंडात लहान रक्कम लावून गुंतवणूक करू शकता. 500 रुपये प्रति महिना SIP गुंतवणूक करून तुमचे लखपती होण्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते. 500 रुपयांमधून 1 कोटी रुपयांचा निधी कसा तयार होऊ शकतो याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देत आहोत. तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये दररोज 17 रुपये प्रमाणे, प्रति महिना फक्त 500 रुपये गुंतवायचे आहे. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांनी 20 टक्के आणि काहींनी तर त्याहून जास्त परतावा मिळवून दिला आहे.

20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी :
म्युचुअल फंड SIP मध्ये तुम्हाला दररोज फक्त 17 रुपये म्हणजेच महिन्याला फक्त 500 रुपये जमा करावे लागतील. ही गुंतवणूक रक्कम 20 वर्षांसाठी म्युचुअल फंड मध्ये जमा करून तुमचे पुढील 20 वर्षात 1.2 लाख रुपये जमा होतील. या 20 वर्षांमध्ये, वार्षिक 15 टक्के परताव्यावर, तुमचा एकूण निधी 7 लाख 8 हजार रुपये एवढा तयार होईल. जर आपण 20 टक्के वार्षिक परताव्याचा विचार केला तर हा एकूण परतावं तब्बल 15.80 लाख रुपये पेक्षा जास्त होईल.

30 वर्षांच्या गुंतवणुकीने करोडपती व्हाल :
जर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवल्यास, पुढील 30 वर्षांत तुमचे 1.8 लाख रुपये बचत होतील. आता तुम्हाला यावर 30 वर्षांसाठी 20 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळाला तर तुम्हाला यावर एकूण 1.16 कोटी रुपये इतका जबरदस्त परतावा मिळेल. गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांवर चक्रवाढ व्याज पद्धतीने लाभ मिळतो. यामध्ये दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. हेच कारण आहे की तुम्ही छोट्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवू शकता आणि तुमचे आर्थिक स्वप्न पूर्ण करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment plan of mutual fund SIP for long term benifits on 18 August 2022

हॅशटॅग्स

#Investment Plan(8)#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x