5 February 2025 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

LIC Mutual Fund | यापूर्वी एलआयसीच्या म्युच्युअल फंड योजनांनी मल्टिबॅगर परतावा दिला आहे, आता एक नवीन फंड लॉन्च, योजना लक्षात ठेवा

LIC Mutual Fund

LIC Mutual Fund | LIC आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना बाजारात लाँच करत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक मल्टीकॅप योजना सुरू केली आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची म्युच्युअल फंड शाखा LIC म्युच्युअल फंडाने 6 ऑक्टोबर 2022 रोजी एक नवीन योजना बाजारात लाँच केली आहे. LIC मार्फत सुरू केलेल्या मल्टीकॅप सेगमेंटमधील या योजनेचे नाव LIC MF मल्टी कॅप फंड असे ठेवण्यात आले आहे. या न्यू फंड ऑफरची सुरुवात 6 ऑक्टोबर 2022 रोजी झाली असून ते 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुले राहील. मल्टीकॅप हा गुंतवणूकीचा एक असा घटक आहे, ज्यात गुंतवणूकदारांचे पैसे सर्व प्रकारच्या बाजार भांडवल असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मल्टीकॅप मध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप सर्व प्रकारच्या स्टॉक चा समावेश होतो. या मल्टी कॅप म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास विविधीकरणाचा फायदा होतो.

योजनेबद्दल थोडक्यात :
LIC ने लॉन्च केलेल्या या मल्टी कॅप म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 5000 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर तुम्ही 1 रुपयेच्या पटीत आणखी रक्कम गुंतवू शकता. त्याच वेळी, या फंडात अतिरिक्त अर्ज करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्ही 1 रुपयेच्या पटीत हवी तेवढी रक्कम गुंतवणूक करू शकता. LIC ने या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नियमित SIP आणि थेट एकरकमी गुंतवणूक या दोन्ही पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत कोणताही एंट्री लोड लादलेला नाही. मात्र एक्झिट लोड 12 टक्के असेल. या मल्टीकॅप म्युचुअल फंडचा बेंचमार्क निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 TRI असेल. या योजनेत गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे गुंतवणुकीवर कोणताही लॉक इन कालावधी देण्यात आला नाही.

मल्टीकॅप फंडचा परतावा : इक्विटी मल्टीकॅप म्युच्युअल फंडमध्ये मिळालेल्या परताव्याचे चार्ट पॅटर्न पाहिल्यास आपणास कळेल की, दीर्घ कालावधीत हे मल्टी कॅप म्युचुअल फंड जबरदस्त परतावा कमावून देतात. मल्टीकॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षात सरासरी 22.टक्के परतावा मिळाला आहे. मागील 5 वर्षात तर मल्टीकॅप म्युचुअल फंडने वार्षिक सरासरी 14 टक्केचा बंपर परतावा कमावून दिला आहे. गेल्या 10 वर्षात हा सरासरी परतावा 16 टक्के वार्षिक होता.

टॉप म्युचुअल फंड योजना :
क्वांट अॅक्टिव्ह फंड : 3, 5 आणि 10 वर्षांमध्ये परतावा: 36 टक्के, 22 टक्के, 20 टक्के
इन्वेस्को इंडिया मल्टीकॅप फंड : 3, 5 आणि 10 वर्षांमध्ये परतावा: 20टक्के, 11टक्के, 17टक्के
सुंदरम मल्टी कॅप फंड : 3, 5 आणि 10 वर्षांमध्ये परतावा: 20टक्के, 11टक्के, 16टक्के
ICICI प्रुडेंशियल मल्टीकॅप फंड : 3, 5 आणि 10 वर्षांमध्ये परतावा: 18टक्के, 12टक्के, 15टक्के
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड : 3, 5 आणि 10 वर्षांमध्ये परतावा: 22टक्के, 14टक्के, 14.5टक्के
बडोदा बीएनपी परिबा मल्टी कॅप फंड : 3, 5 आणि 10 वर्षांमध्ये परतावा: 21.5टक्के, 12टक्के, 13टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC Mutual fund Has Launched MultiCap Mutual fund scheme for long term investment on 07 October 2022.

हॅशटॅग्स

#LIC Mutual Fund(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x