17 April 2025 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

LIC Mutual Fund | खरंच! LIC शेअरने खिसा खाली केला, पण LIC म्युचुअल फंडाच्या या योजना 1 लाखाचे 18 लाख करत आहेत

LIC Mutual fund

LIC Mutual Fund | LIC जीवन विमा कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. हा स्टॉक शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून कधीही आपल्या IPO किंमतीवर पोहोचला नाही. LIC स्टॉक लिस्टिंग झाल्यापासून सतत दबावात ट्रेड करत आहे. एलआयसी स्टॉक IPO किंमतीच्या तुलनेत 32 टक्के पडला आहे. एलआयसी कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे LIC स्टॉक सतत पडत आहे, तर दुसरीकडे एलआयसीच्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन मालामाल केले आहे. केवळ 20 वर्षांत LIC म्युच्युअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 18.50 पट वाढवले आहेत.

भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. LIC कंपनीच्या अनेक म्युच्युअल फंड योजना देखील चालू आहेत ज्यांनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 10 टक्के ते 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 20 वर्षांत 18.70 लाख रुपये परतावा मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊ LIC च्या जबरदस्त म्युचुअल फंड योजनाबद्दल सविस्तर माहिती.

LIC लार्ज कॅप म्युचुअल फंड :
* 20 वर्षांचा परतावा : 15.76 टक्के CAGR
* 20 वर्षाचा SIP परतावा : 12.68 टक्के
* 20 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 1.11 कोटी रुपये
* 20 वर्षांत 10,000 SIP चे मूल्य : 18.70 लाख रुपये

LIC लार्ज कॅप म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 15.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत 1 लाख रुपयेची गुंतवणूक आता वाढून 18.70 लाख रुपये झाली आहे. ज्या लोकांनी LIC म्युचुअल फंड योजनेत 10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती, त्यांना आता 1.10 कोटींहून अधिक परतावा मिळाला आहे. या योजनेत एकरकमी गुंतवणूक रक्कम मर्यादा किमान 5,000 रुपये आहे. SIP गुंतवणूकीची किमान रक्कम मर्यादा रक्कम 1,000 रुपये आहे.

LIC Mutual Fund Tax Scheme:
* 20 वर्षांचा परतावा : 14 टक्के
* 20 वर्षांचा SIP परतावा : 11.89 टक्के
* 20 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 1 कोटी रुपये
* 20 वर्षांत 10,000 SIP चे मूल्य : 13.75 लाख रुपये

LIC MF टॅक्स प्लॅनने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के वार्षिक या दराने परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी यात 1 लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांना या काळात 13.75 लाख रुपये परतावा मिळाला आहे. ज्या लोकांनी दरमहा 10,000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांचे पैसे 20 वर्षांत 1 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये जमा करून एकरकमी गुंतवणूक सुरू करू शकता. किमान 1000 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करु शकता.

एलआयसी MF फ्लेक्सी कॅप फंड :
* 20 वर्षांचा परतावा : 12.84 टक्के
* 20 वर्षांचा SIP परतावा : 10.28 टक्के
* 20 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 11.20 लाख
* 10,000 SIP चे 20 वर्षांत मूल्य : 89 लाख रुपये

LIC MF Flexi Cap Fund ने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 12.85 टक्के या दराने परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या योजनेत 1 लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांना आता 11.20 लाख रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी ज्या लोकांनी या योजनेत दरमहा 10,000 रुपयांची SIP गुंतवणूक सुरू केली होती, त्यांना आता 81,89,994 रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत तुम्ही किमान 5000 रुपये जमा करून एकरकमी गुंतवणूक सुरू करू शकता. आणि किमान 1000 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करु शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC Mutual fund Scheme for Investors for long term investment for earning huge Return on 06 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LIC Mutual Fund(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या