Multibagger Mutual Fund | 5-स्टार रेटिंग आणि तगडा परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, 10000 च्या SIP वर मिळतोय 10.05 लाख परतावा
Multibagger Mutual Fund | जेव्हा गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांनी गुंतवणुकीतील जोखमीचा विचार करून जास्त परतावा देणाऱ्या म्युचुअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास प्राथमिकता दिली पाहिजे. म्युच्युअल फंड तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारानी इक्विटी म्युच्युअल फंडात किमान 5 वर्षे नियमित गुंतवणूक करावी, जेणेकरून तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळाला परतावा उपभोगता येईल. इक्विटी म्युच्युअल फंड हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सकारात्मक विविधता आणण्याची क्षमता ठेवतो. म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे इक्विटी फंडांवर महागाईचा कोणताही परिणाम होत नाही. दीर्घकाळात म्युचुअल फंडमधे उच्च परतावा देण्याची क्षमता आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या तीन 5-स्टार-रेट केलेले इक्विटी म्युच्युअल फंडची माहिती देणार आहोत, ज्यांनी केवळ तीन वर्षांत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुकीवर 10 लाखांपर्यंत परतावा मिळवून दिला आहे.
क्वांट टॅक्स प्लॅन – डायरेक्ट प्लॅन :
1 जानेवारी 2013 रोजी हा म्युचुअल फंड प्लॅन लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टारकडून हा फंडाला 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. परिणामी 9 वर्षांहून अधिक काळ झाला हा फंड कार्यरत असून, आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, या फंडाने महील तीन वर्षांत वार्षिक 47 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. परिणामी, जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड मध्ये 1 लाखाची प्रारंभिक गुंतवणूक केली असती, किंवा 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला 10,05,531 रुपये परतावा मिळाला असता.
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन :
19 डिसेंबर 2018 रोजी हा म्युचुअल फंड लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्चने या फंडला 5-स्टार रेटिंग दिले आहे. हा म्युचुअल फंड मागील तीन वर्षांपासून कार्यरत असून, आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. 30 जून 2022 रोजी बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅनची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता 353.51 कोटी रुपये होती. 16 सप्टेंबर 2022 पर्यंत या फंडाची म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 29.01 रुपये होते. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.12 टक्के आहे, जे त्याच श्रेणीतील इतर म्युचुअल फंडांपेक्षा भरपूर चांगले मानले जाते. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत 43.25 टक्केचा वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी दर महिन्याला 10,000 ची SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर या तीन वर्षांत तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 9,45,874 रुपये झाले असते.
कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन :
15 फेब्रुवारी 2019 रोजी कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्चने या म्युचुअल फंडला 5-स्टार रेटिंग दिले आहे. हा म्युचुअल फंड 3 वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत असून, आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून आहे. 30 जून 2022 रोजी कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडची अॅसेट अंडर मॅनेजमेंट 3455.06 कोटी रुपये होती. 16 सप्टेंबर 2022 रोजी या फंडाची NAV म्हणजे निव्वळ मालमत्ता मुख्य 26.9 रुपये होते. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या योजनेत 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक केली असती किंवा 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती तर, तुम्हाला आता एकूण 9,82,585 रुपये चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळाला असता. या म्युचुअल फंडाचा वार्षिक सरासरी व्याज परतावा 45.46 टक्के पेक्षा पाधिक राहिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Mutual fund has given huge returns to investors on SIP investment on 19 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON