15 January 2025 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Multibagger Mutual Fund | शेअर नव्हे ही म्युचुअल फंड योजना श्रीमंत बनवतेय, जमा झाले 10 लाख रुपये आणि मिळाले 2.5 कोटी रुपये

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही या लेखात तुम्हाला एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालावधी मध्ये जोरदार परतावा मिळवून दिला आहे.

म्युच्युअल फंड – ICICI Pru Value Discovery Fund :
जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ह्या लेखात तुम्हाला अश्या एका जबरदस्त म्युचुअल फंड बद्दल माहिती मिळेल ज्यात गुंतवणूक करून लोकं अक्षरशः करोडपती झाले आहेत. या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा दिला आहे. या फंडाचे नाव आहे, ICICI प्रूडेंशियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड. हा म्युचुअल फंड ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या कंपनीचा आहे. या म्युचुअल फंडाने मागील 18 वर्षांत 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 2.5 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. हा म्युचुअल फंड उद्योगातील आघाडीचा फंड म्हणून ओळखला जातो. ही देशातील दुसरी सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी असून ICICI प्रुडेंशियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाने आता 18 वर्षे पूर्ण केली आहेत.

परतावा आकडेवारी नुसार कामगिरी :
31 जुलै रोजी या फंडाची मालमत्ता 24,694 कोटी रुपये नोंदवण्यात आली आहे. या श्रेणीतील एकूण मालमत्ता पैकी 30 टक्के वाटा या फंड हाऊसचा आहे. यावरून असे दिसते की या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा त्यावर पूर्ण विश्वास असल्याचे दिसून येते. ही म्युचुअल फंड योजना “मूल्य गुंतवणूक पद्धतींचा” अवलंब करते. हे विविध प्रकारच्या शेअर्सच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करते जे आकर्षक मूल्यमापनावर आणि सवलतीच्या किमतीत उपलब्ध असतात.

म्युचुअल फंड ची वाटचाल :
16 ऑगस्ट 2004 रोजी हा म्युचुअल फंड सुरू करण्यात आला होता. याने वार्षिक दराने 19.7 टक्के परतावा दिला आहे. हेच 10 लाख रुपये तुम्ही निफ्टी 50 मध्ये गुंतवले असते तर त्यावर तुम्हाला या फंडापेक्षा 15.6 टक्के CAGR दराने कमी परतावा मिळाला असता. आणि तुमची परतावा रक्कम फक्त 1.3 कोटी रुपये झाली असती. आयप्रोच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाने एसआयपी गुंतवणुकीतही जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही स्थापनेपासून हा म्युचुअल फंड मध्ये दरमहा 10,000 रुपये ची SIP गुंतवणूक केली असती, तर ती रक्कम आता 1.2 कोटी रुपये झाली असती. तर या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक फक्त 21.6 लाख रुपये अस्ती. म्हणजेच, त्याचा परतावा वार्षिक 17.3 टक्के असता. मागील 7 वर्षांच्या SIP चा परतावा 15.81 टक्के आहे, 5 वर्षांचा SIP परतावा 18.97 टक्के आहे आणि 3 वर्षांचा SIP गुंतवणूक वरील परतावा 27.59 टक्के आहे.

तज्ञ काय म्हणतात :
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मध्ये गुंतवणूक करणारे तज्ञ असे म्हणतात की “मागील काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा म्युचुअल फंड मधील विश्वास आणि गुंतवणुकीसाठी वाढलेले आकर्षण हे बरेच वाढले आहे. लोकांना आता म्युचुअल फंड गुंतवणुकीची जाणीव झाली आहे आणि ते मूल्य काय आहे आणि ते का महत्त्वाचे आहे हे त्यांना समजले आहे. आणि नियमित गुंतवणुकीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, परदेशात “गुंतवणूक मूल्य” ही एक प्रस्थापित आणि चांगल्या प्रकारे शोधलेली संकल्पना आहे..भारतीयांमध्ये प्रत्येक गोष्टीत त्यांचे मूल्य पाहण्याची क्षमता आहे. आम्हाला विश्वास आहे की “गुंतवणूक मूल्य” शक्य तितक्या लवकर आपल्या जीवनात अधिकाधिक लागू होईल. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की शांत आणि संयमी गुंतवणूकदारासाठी दीर्घ कालावधीसाठी केलेली मूल्य गुंतवणूक चांगला परतावा देईल. चांगले गुंतवणूक मूल्य दीर्घ कालावधीसाठी स्थिरता प्रदान करणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करूनच प्राप्त केले जाऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Mutual Fund return on investment for long term benefits on 20 August 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x