16 November 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Multibagger Mutual Funds | म्युच्युअल फंडातील 5000 रुपयांची SIP गुंतवणूक देऊ शकते 1 कोटीचा परतावा, हे 5 मल्टिबॅगर फंड सेव्ह करा

Multibagger Mutual fund

Multibagger Mutual Funds | आज या लेखात आपण अश्या म्युचुअल फंड योजनांची माहिती घेणार आहोत, ज्यात फक्त 5000 रुपयांची मासिक गुंतवणुक करून तुम्ही 20 वर्षांमध्ये 1 कोटीपेक्षा अधिक परतावा कमवू शकता. एसआयपी परताव्याच्या दृष्टीने टॉप पाच इक्विटी फंडचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत. गुंतवणूकदार सामान्यतः चांगल्या परताव्यासाठी भांडवली बाजारात पैसे गुंतवणुकीचा विचार करतात. जोखीम क्षमता जास्त नसलेले गुंतवणूकदार लहान बचती करतात, किंवा लहान गुंतवणूक करतात.अश्या लहान योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कमी परंतु स्थिर परतावा मिळत असतो. दुसरीकडे, जर तुम्ही थोडीफार जोखीम घेण्यास तयार असाल तर इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक तुम्ही चांगला परतावा कमवू शकता.

इक्विटी मार्केट हे गुंतवणुकीचे असे साधन आहे, जिथे गुंतवणूक योग्य प्रकारे केली तर तुम्ही खूप कमी काळात श्रीमंत होऊ शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थेट इक्विटी मार्केटच्या गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित असते. बाजारात अशा अनेक इक्विटी योजना आहेत ज्यांनी खूप कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे.

गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी म्युच्युअल फंडामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स म्हणजेच SIP पद्धतीने गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. म्युचुअल फंड मध्ये तुमचे एकाच वेळी गुंतवले जात नाही, तर तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याचा पर्याय दिला जातो. तुम्ही वेळोवेळी SIP टॉप अप देखील करू शकता, म्हणजेच तुम्ही तुमच्या SIP मध्ये वाढ देखील करू शकता. म्युचुअल फंड एसआयपीत होणारा फायदा दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावरच दिसतो. म्युचुअल फंड SIP मध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांची माहिती दिली आहे, ज्यात फक्त 5000 रुपयांची मासिक गुंतवणुक केल्याने तुम्ही वीस वर्षांत 1 कोटीपेक्षा अधिक परतावा मिळवू शकता.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड :
* 20 वर्षाचा परतावा : 24.45 टक्के CAGR
* एकूण गुंतवणूक मूल्य : 1.60 कोटी रुपये
* एकूण मालमत्ता : 13,225 कोटी
* किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा :100 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 28 टक्के

सुंदरम मिड कॅप फंड :
* 20 वर्षांचा परतावा : 5000 रुपये च्या मासिक SIP वर 24.25 टक्के CAGR
* गुंतवणूक मूल्य : 1.60 कोटी रुपये
* एकूण मालमत्ता : 7515 कोटी रुपये
* किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 21 टक्के

फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड :
* 20 वर्षाचा परतावा: 22.40 टक्के CAGR
* 5000 रुपये मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य: 1.27 कोटी रुपये
* एकूण मालमत्ता : 7582 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक : 500 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.88 टक्के

डीएसपी फ्लेक्सी कॅप फंड :
* 20 वर्षाचा परतावा: 22.12 टक्के CAGR
* 5000 रुपयेचे मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य: 1.22 कोटी रुपये
* एकूण मालमत्ता : 7990 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.92 टक्के

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड :
* 20 वर्षाचा परतावा: 22 टक्के CAGR
* 5000 रुपये मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य :1.20 कोटी रुपये
* एकूण मालमत्ता : 30473 कोटी रुपये
* किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.77 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual fund SIP scheme for long term investment on 16 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x