Multibagger Mutual Funds | पैसे अनेक पटींनी वाढवण्यासाठी या 4 म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करा, 3 वर्षांत व्हाल करोडपती

Multibagger Mutual Funds | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच म्युचुअल फंड SIP गुंतवणूक पद्धत लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे. मागील काही वर्षांत SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यां लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे SIP गुंतवणूक अतिशय सोपी अशी गुंतवणूक पद्धत असून या माध्यमातून तुम्ही दरमहा पैसेही बचत करू शकता, आणि अल्पावधीत भरघोस नफा कमवू शकता. SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. यामुळे तुमच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही आणि दीर्घकाळात तुमच्या कडे मोठा फंड तयार होऊ शकतो.
तीन वर्षांत बंपर परतावा :
जर तुम्ही अद्याप म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक केली नसेल किंवा तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या लेखात मजबूत कामगिरी करणाऱ्या काही SIP म्युच्युअल फंडबद्दल माहिती देणार आहोत. या म्युच्युअल फंडात तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करून दीर्घकाळात मोठा परतावा कमवू शकता. या म्युच्युअल फंड योजनांनी SIP माध्यमातून गुंतवणूक केलेल्या लोकांना अवघ्या तीन वर्षांत बंपर परतावा कमावून दिला आहे.
1. ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 42.1 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये आणि निव्वळ मालमत्ता मूल्य रुपये 163 आहे. रिसर्च फर्म क्रिसिलने या फंडाला 3 स्टार रेटिंग दिले असून आपल्या ग्राहकांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड यासारख्या मोठया दिग्गज कंपनीत ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडने मोठी गुंतवणुक केली आहे.
2. टाटा डिजिटल इंडिया फंड :
Tata Digital India Fund ने मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 39.4 टक्के इतका भरगच्च परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 3842 कोटी रुपये असून निव्वळ मालमत्ता मूल्य 38.2 आहे. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.02 टक्के आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागेल. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड यासारख्या मोठ्या दिग्गज कंपनीत Tata Digital India फंडाची मोठी गुंतवणूक आहे.
3. आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड :
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंडाने मागील तीन वर्षांत 40.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. या फंडाची एकूण मालमत्ता 2658 कोटी रुपये असून निव्वळ मालमत्ता मूल्य/NAV रुपये 140 आहे. या फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.19 टक्के आहे. या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करु शकता. आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंडाची सरवत मोठी गुंतवणूक इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड यासारख्या मोठ्या कंपनीत आहे.
4. SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडात गुंतवणूक केलेल्या लोकांना मागील तीन वर्षात 36.6 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 1891 कोटी आणि असून निव्वळ मालमत्ता मूल्य/NAV 156 रुपये आहे. तुम्ही म्युचुअल या फंड योजनेत किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. आणि त्याचे खर्चाचे प्रमाण 2.27 टक्के आहे. इन्फोसिस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अल्फाबेट इंक, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड या सारख्या दिग्गज कंपन्या SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडाचे टॉप गुंतवणूक असलेले स्टॉक आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Mutual funds which has given huge returns in short term on 10 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER