Mutual Fund Investment | आंधळेपणाने केलेली गुंतवणूक पडेल महागात; या 3 चुकांमुळे स्वतःचे नुकसान कराल, लक्षात ठेवा
Mutual Fund Investment | सध्याच्या घडीला एसआयपी तसेच म्युच्युअल फंड या योजना अत्यंत लोकप्रिय होत चालल्या आहेत. बहुतांश लोक करोडपती बनण्यासाठी विविध म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे गुंतवायला सुरुवात करतात.म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे एक असे साधन आहे त्यामध्ये तुम्ही अगदी 500 रुपयांपासून देखील गुंतवणूक सुरू करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही तुम्हाला हवा तेवढा निधी जमा करत राहू शकता.
दीर्घकाळात जास्तीत जास्त परतावा मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून लोक आपला फायदा करून घेतात. कारण की इतर योजनांपेक्षा किंवा इतर गुंतवणूक फंडापेक्षा म्युच्युअल फंड एसआयपी तुम्हाला 12% व्याजदर प्रदान करते. त्याचबरोबर कंपाऊंडिंग व्याजाचा देखील लाभ मिळतो. ज्यामुळे मोठा कॉर्पस तयार होतो. परंतु म्युच्युअल फंड ही बाजाराशी निगडित योजना आहे त्यामुळे परताव्याची हमी कन्फर्म नसते. आज आम्ही 3 प्रकारची माणसं सांगणार आहोत. ज्यांनी शेअर मार्केटची लिंक असलेल्या म्युच्युअल फंडापासून लांब राहिलेले चांगले.
1. व्यक्ती आगाऊ शुल्क भरण्यास तयार नसेल तर :
बऱ्याचदा पुरेपूर माहिती नसलेल्या व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. परंतु त्यांना अतिरिक्त शुल्क भरण्यास जीवावर येते आणि आपल्याकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत का अशी शंका देखील त्यांच्या मनात निर्माण होते. परंतु असं नसून तुमची गुंतवणूक हाताळण्याकरिता एक्सपेन्स रेश्योच्या स्वरूपात अतिरिक्त शुल्क आकारले जातात.
मालमत्ता व्यवस्थापन कंपनी म्हणजेच AMC ही संपूर्ण वितरणाचा खर्च उचलते. त्याचबरोबर फंडाचे संरक्षण आणि ऑडिटिंगचे खर्च देखील उचलते. हे सर्व प्रकारचे खर्च म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराकडूनच वसुलेले जातात. यामध्ये फंड हाऊसेस त्यांच्या दैनंदिन गरजाची तुलना करूनच खर्चाची तुलना करतात आणि त्यानुसार तुमच्याकडून अतिरिक्त पैसे घेतात.
2. दीर्घकाळ गुंतवणूक करायची नसेल तर :
बाजारात उपलब्ध असलेले विविध म्युच्युअल फंड यांचं कनेक्शन थेट शेअर मार्केटशी निगडित असते. त्याचबरोबर जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे दीर्घकाळासाठी मोठी संपत्ती किंवा मोठा निधी जमा करून ठेवण्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड या योजनांकडे पाहिले जाते. तुम्ही यामध्ये कमी वेळासाठी देखील गुंतवणूक करू शकता. परंतु जास्तीत जास्त काळ गुंतवणूक करून तुम्ही भली मोठी संपत्ती तयार करू शकता. समजा तुम्हाला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर, पोस्टाच्या योजनांपैकी किंवा इतर कोणत्याही शॉर्ट टर्म योजनेमध्ये पैसे गुंतवले तरी चालतील.
3. टॅक्स भरायचा नसेल तर :
म्युच्युअल फंड सोडलं तर तुम्हाला इतर कोणत्याही फंडमध्ये किंवा योजनेमध्ये कर सवलत मिळते. परंतु म्युच्युअल फंडाचे तसे नसते. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड टॅक्सेबल पाहायला मिळतात. कर भरल्यामुळे तुमच्या नफ्यामध्ये थोडाफार प्रमाणात घट होऊ शकते. त्यामुळे तुमची कर भरण्याची तयारी नसेल तर, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा मुळीच विचार करू नका.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Mutual Fund Investment 29 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL